Keral Travel esakal
लाइफस्टाइल

Keral Travel : बॅग भरो और निकल पडो! उन्हाळ्याच्या सुट्टीत केरळमध्ये भेट देण्यासाठी 'ही' आहेत सर्वोत्तम ठिकाणे

Monika Lonkar –Kumbhar

Keral Travel : भारतातील दक्षिण भारत हा निसर्गसौंदर्याने संपन्न असलेला प्रदेश आहे. दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणा इत्यादी राज्यांचा समावेश होतो. या राज्यांमध्ये विविध प्रकारची पर्यटनस्थळे प्रसिद्ध असून या ठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे आहे. त्यामुळे, दरवर्षी देश विदेशातील असंख्य पर्यटक या दक्षिण भारतात भेट देतात.

दक्षिण भारतातील केरळ हे राज्य पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. या राज्यात एकापेक्षा जास्त पर्यटन स्थळे असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. केरळला देवभूमी म्हणून ही ओळखले जाते. या राज्यातील नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल यात काही शंका नाही.

तुम्ही कौटुंबिक सहलीसाठी किंवा हनिमूनसाठी केरळमध्ये नक्कीच जाऊ शकता. आता लवकरच मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागेल, या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर तुम्ही मुलांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर केरळचा विचार करायला काही हरकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात केरळमधील प्रसिद्ध ठिकाणांबद्दल. (These are the best places to visit in Kerala during summer vacation)

वायनाड (Wayanad)

केरळ राज्यातील वायनाड हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. या परिसरात ऐतिहासिक लेणी, धबधबे आणि विविध पर्यटनस्थळे आहेत. ही सर्व पर्यटनस्थळे लोकांच्या आवडीची आहेत. त्यामुळे, वर्षभर या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. येथील दऱ्याखोऱ्यांमधील नयनरम्य परिसर, हिरवळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

मुन्नार (Munnar)

जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर मुन्नार तुमच्यासाठी बेस्ट पर्यटनस्थळ ठरू शकते. हे एक सुप्रसिद्ध हिलस्टेशन असून येथील निसर्गरम्य परिसर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पाहून तुमचा येथून पाय निघणार नाही. एवढ हे ठिकाण अप्रतिम आहे. चहाच्या बागांसाठी देखील मुन्नार सुप्रसिद्ध आहे. येथे आल्यावर तुम्ही चहाच्या बागांना भेट देऊ शकता. येथील इको पॉईंटवर तुम्ही अनेक प्रकारच्या उपक्रमांचा देखील आनंद घेऊ शकता.

अलेप्पी (Alleppey)

केरळमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेले ठिकाण म्हणजे अलेप्पी होय. या परिसरात वर्षभर देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी असते. व्हॉलिबॉल आणि सर्फिंगसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी हा समुद्रकिनारा बेस्ट ऑप्शन ठरू शकता. या बीचवर तुम्ही विविध प्रकारच्या वॉटरस्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT