Discipline and parents sakal
लाइफस्टाइल

‘पालन’गोष्टी : शिस्त आणि पालक

‘आपली वस्तू जागेवर उचलून ठेवायचं कळत नाही का तुला?...’ बाबा ओरडले आणि शशीनं बेडवर पडलेला ओला टॉवेल उचलून दाखवला आणि तो बाहेर निघून गेला.

सकाळ वृत्तसेवा

- फारूक काझी, बालमानसविषयक साहित्यिक

‘आपली वस्तू जागेवर उचलून ठेवायचं कळत नाही का तुला?...’ बाबा ओरडले आणि शशीनं बेडवर पडलेला ओला टॉवेल उचलून दाखवला आणि तो बाहेर निघून गेला.

अवघ्या १० वर्षांचा शशी. असं का करून गेला? आणि बाबा का बरं गप्प बसले?

तुमच्या लक्षात आलं का? तो उचलून दाखवलेला टॉवेल बाबांचा होता. बाबांनी तो नेहमीच्या सवयीने बेडवर टाकला होता. तसाच ओला.

म्हणून बाबा गप्प झाले.

आपल्या मुलांना शिस्त लागावी म्हणून आपण सातत्यानं ओरडत असतो. वस्तू जागेवर ठेवा, कचरा करू नका वगैरे वगैरे. हे मुलांना नीट समजावून सांगितलंच पाहिजे; पण हे सर्व सांगताना आपण मुलांना जे सांगतोय तसंच आपणही वागतोय का, हे पण पडताळून बघितलं पाहिजे.

हो, कारण शिस्तीचा आग्रह धरणारे आपण स्वत: बेशिस्तीने वागत आहोत हे इतर कुणी सांगेलच असं नाही. कारण घरात आपली दहशत असते. लहान मुलांनी चुका दाखवल्या तर ते उद्धट आहेत असा शेरा मारला जातो.

आपण आणखी एक उदाहरण बघू. जेवण करताना ताटातील सगळं संपवलं पाहिजे हा घरातला शिरस्ता असतो; पण अशावेळी घरातील मोठ्या व्यक्तींना अमुक एक भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळी भाजी केली गेली तर आपण घालून दिलेला नियम आपणच मोडला असा त्याचा अर्थ होईल. पथ्य म्हणून एखादा पदार्थ न खाणं समजू शकतं; पण आवडत नाही म्हणून न खाणं हा नियम जर मोठ्यांसाठी लागू होत असेल तर मुलंही त्याला अपवाद ठरू नयेत. तेव्हा जी शिस्त मुलांना लागावी असं आपणाला वाटतं, तीच शिस्त आपण पाळली तर मुलं थोडी खळखळ करत का होईना ती शिस्त पळतील. सर्व अन्नघटक आहारात असावेत असं आपण म्हणत असू, तर आपणही काही गोष्टी पाळल्या पाहिजेत.

शिस्तबद्ध जीवन वाईट नसतं हे मुलांना पटवून दिलं पाहिजे. समंजसपणे मुलांशी यावर बोललं पाहिजे. परंतु आपण स्वत: शिस्त न पाळता मुलांनी व घरातील इतरांनी ती पाळली पाहिजे असा आग्रह आपण करत राहतो. यालाच इतरांनी शिस्तबद्ध राहावं असं वाटणारे बेशिस्त पालक म्हणतात. आपला टॉवेल, आपले कपडे, आपले शूज-चपला, आपल्या वापरलेल्या वस्तू इत्यादी जागच्या जागी ठेवणे.

पाहुणे आले तर घरच्या कामात मदत करणे, घरतील कुणी आजारी असेल तर त्याच्या हिश्श्याची कामे करणे, आजारी व्यक्तीची जमेल ती सेवा करणे, घर स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न करणे यांसारखी कितीतरी कामे आपण स्वत: केली पाहिजेत. हीच शिस्त मुलं शिकतील आणि आपला कितीतरी मोठा ताण हलका होईल.

त्यामुळे शिस्तबद्ध पालक असणं ही शिस्तबद्ध मुलांसाठीची पहिली महत्त्वाची गरज आहे; पण, टोकाची शिस्त टाळून हे सर्व करता येणंही तितकंच महत्त्वाचं. कारण कठोर शिस्त मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातला मोठा अडसर ठरते. आणि पालक म्हणून ते आपलं अपयश.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT