Fashion Tips esakal
लाइफस्टाइल

Fashion Tips : पावसाळ्याची Shopping List काढलीत का, या गोष्टी राहिल्या तर नाहीत ना?

पावसाळ्यानुसार आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये काही आवश्यक बदल केले पाहिजेत

Pooja Karande-Kadam

Fashion Tips :  मान्सून आला आहे आणि आपण त्याची पूर्ण तयारी केली असेल, परंतु आपण कितीही तयारी केली तरी ती कधीच पुरेशी नसते. तुम्हाला . पुन्हा पुन्हा असे वाटते की काहीच शिल्लक राहिलेले नाही? पण काळजी करण्याची गरज नाही.

जर तुम्हाला पावसाळ्यासाठी अद्याप काहीही खरेदी करता आले नसेल किंवा काय खरेदी करावे याबद्दल संभ्रमात असाल तर येथे आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू सांगत आहोत.

अनेक शहरांमध्ये मान्सूनदाखल झाला असून अनेक शहरांमध्ये हजेरी लावत आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळ्यानुसार आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये काही आवश्यक बदल केले पाहिजेत. हा देखील सेलचा हंगाम आहे, त्यामुळे शॉपिंगला जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

बॅग कशी असावी

पावसाळ्यात एखादी नवी बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वॉटरप्रूफ बॅगेची निवड करावी. यामुळे पावसाळ्यात बॅग भिजली तरी त्यातील पैसे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ओले होणार नाही. पावसाळ्यातील फॅशन आणि सुरक्षा असेल अशाच बॅगची निवड करा.

या सीझनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जॅकेट किंवा रेनकोट निवडू शकता. विंड शीटऐवजी ते पावसाळ्यात ही कमाल करतील आणि तुम्हाला स्टायलिश लूकही देतील.

वॉटरप्रूफ मेकअप

पाऊस पडला तर मेकअप वाहून जाईल. म्हणून वॉटरप्रूफ मेकअप करा. जर तुमच्याकडे वॉटरप्रूफ मेकअप किट नसेल तर ते ताबडतोब बाजारातून खरेदी करा जेणेकरून तुम्ही पावसाळ्यातही स्वत:ला सेक्सी आणि ग्लॅमरस लूक देऊ शकाल.

छत्री-टोपी घ्यावीच लागते

पावसापासून शरीराचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. पावसात भिजणे काही वेळापुरते रोमॅन्टीक वाटत असले तरी ते आजारीही पाडू शकते. यासाठी तुम्ही छत्रीव्यतिरिक्त टोपीचाही वापर करू शकता. हल्ली अनेक प्रकारच्या टोप्या ट्रेंडमध्ये आहेत. आपल्या आवडीची टोपी घ्या आणि ती घाला. केस सुरक्षित राहतील आणि तुम्हाला स्टायलिश लुकही मिळेल.

पावसाळी चपलांची निवड

पावसाळ्यात पुर्णपणे वॉटरप्रुफ असलेलीच पादत्राणे वापरा. काही लोकांना चामड्याच्या मोजडी, पायताण वापरण्याची हौस असते. पण पावसाळ्यात अशा चपला घालू नका. पावसात भिजल्याने चामड्याच्या चपलावर बुरशी येते. त्यामुळे त्या चपला खराब होतात.

पावसाळ्यात फॅशनेबल आणि स्टायलिश पादत्राणे घेण्याऐवजी पाणी आणि घाणीतही घालू शकतील अशी पादत्राणे घ्या आणि ती खराब होणार नाहीत. ते आपल्या पायांचे रक्षण देखील करतात.

त्वचेची काळजी

पावसाळ्यात त्वचा  सतत ओली राहील्याने बोथट होते. तेव्हा त्यावर योग्य त्या क्रिम्सचा वापर करा. ज्यामुळे स्कीन बोथट होणार नाही. तसेच पावसात जाण्याआधी त्वचेला मॉईश्चरायझर लावा. त्यामुळे पावसाळ्यात त्वचा कोमल राहण्यास मदत होईल.

कपडे शॉर्ट घालणे टाळा

पावसात मॅक्सी ड्रेसऐवजी मिड लेंथ ड्रेस, कॅप्री किंवा लहान हेमलाइन बॉटम्स घ्या. त्यामुळे जेणेकरून पावसाळ्यात कोणतीही अडचण येणार नाही.

पावसाळ्यात कपड्यांचे रंग कसे असावेत

मान्सूनमध्ये हटके दिसायचे असेल तर इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे तुमच्या कपड्यांची निवड करा. कलरफुल आणि आरामदायी असे कपडे घाला. परंतु पावसाळ्यात सफेद रंगाचे कपडे घालणे टाळा. भिजल्यावर त्यावर डाग लागण्याची शक्यता असते आणि डाग जर गेला नाही तर पूर्ण कपडे घराब होतात.

आणखी महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात जीन्स घालणे टाळा. यामध्ये जरी तुम्हाला कंम्फर्टेबल वाटत असले तरीही तुम्ही भिजल्यानंतर जीन्स जड होते. त्यामुळे तुम्हाला स्वत:लाच अनकंम्फर्टेबल वाटू शकते.

कपडे कसे निवडाल


प्रत्येक ऋतूत डेनिमची फॅशन करता येते. पण पावसाळ्यात जरा ती अवघड वाटते. कारण डेनिम भिजल्यानंतर जड होते. आणि ते धुतल्यास पटकन वाळत नाही. त्यामुळे या दिवसात उबदार पण वाळण्यास सोपे असलेली कपडे घालावीत. तसेच, लाइक्रा, मलमल, पॉलिस्टर असे कपडे वापरा. या कपडय़ांमध्ये डिओचा चांगला वापर करता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT