work from home google
लाइफस्टाइल

Fashion Tips : वर्क फ्रॉम होम करताना परफेक्ट आउटफ़िट कोणते घालावे? ; या सेलेब्सकडून घ्या टिप्स!

घरात काम करताना कोणते कपडे घालावेत ज्यामुळे तूम्हाला आणि कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनाही बरे वाटेल, ते पाहुयात.

नमिता धुरी

मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये करोना महामारीमुळे बर्‍याच कंपन्यांमधील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत होते. हळूहळू परिस्थिती बदलत गेल्याने कर्मचारी कामावर पुन्हा जाऊ लागलेत. वर्क फ्रॉम होम बंद करता आता कर्मचाऱ्यांनी पुन्हा ऑफिसमध्ये येऊन काम करावे, असे ऑफिसमधून आदेश देण्यात आले असले तरीही काही कंपनी अशा आहेत ज्यांचे काम अद्याप ही घरून सुरु आहे. तर काही कंपन्यांमध्ये हायब्रीड मोडवर काम सुरु आहे.

Fashon Tips

कोरोना आला की घरून आणि गेला की ऑफीसमधून असे काम गेली २ वर्ष सुरू राहते. ऑफिसला जायचे म्हटले की, कर्मचारी टापटीप होऊन जातात. पण घरीच काम असल्यावर घरातच आहे दिसवभर कुठ नव्या कपड्यांची इस्त्री खराब करायची, असे म्हटले जाते. त्यामुळे लोक घरात रोजच्या वापराचे, चुरगळलेले कपडे घालून बसतात.

तूम्हीही बसला असाल. पण, त्यामुळे कामात मन लागत नाही. त्यामुळे घरात काम करताना कोणते कपडे घालावेत ज्यामुळे तूम्हाला आणि कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनाही बरे वाटेल, ते पाहुयात.

ऑफिसला जायची गडबड असल्याने आपल्याला लवकर उठावे लागते. पण घरी काम करताना तसे होत नाही. त्यामुळे गजर वाजला तरी तो बंद करून अजून थोडावेळ लोळत पडा. ऑफीस टाईम 9 चे असेल तर त्याआधी 10 मिनीटे उठा फ्रेश व्हा आणि त्याच कपड्यात मिटींग अटेंड करा. असे केल्याने तूम्हाला कोणी काहीही बोलणार नाही उलट तूमच्या लुकचे कौतूकच होईल.

कारण, मिटींगच्या एक दिवस आधी तूम्ही नाइट वेअर म्हणून सोनम कपूरचा हा ड्रेस कॉपी करा. सोनमने हा गोल्डन सॅटिन सेट मीटिंगसाठी कसे तयार रहावे याचे उत्कृष्ट उधाहरण आहे.

Fashon Tips

सकाळचे मॉर्निंग वॉक आणि योगानंतर लगेचच मीटिंगला उपस्थित राहावे लागते तेव्हा काय करावे? असा प्रश्न पडतो. योगा आऊटफीट आणि ऑफिस फॉर्मल्स एकत्र घालण्याची चूक कशी करू नये यासाठी खुशी कपूर तूम्हाला टिप्स देते. या योगा ड्रेसमध्ये तुम्ही केस वर करून पोनीटेल बनवा, ओठांवर लिपग्लॉस लावा आणि तुम्ही तुमच्या मिटींगसाठी तयार आहात.

इंचरव्हूव किंवा कॉन्फरन्स कॉल लाइनअप आहे का?, त्यावेळी घाईत क्रिती सॅननसारखा ड्रेस निवडा? मॅचिंग कॉरडरॉय पॅंटसह बॉक्सी शर्ट निवडा. यावर तूम्ही सरळ केस, फिंगर सिग्नेट आणि हलका मेकअप करून तुमचा लुक पूर्ण करून झटपट कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी होऊ शकता.

कतरिना कैफचा हा सिंपल लुक केल्याने तूमचे कौतूक नक्की होईल. हा क्लासी टी-शर्ट जॉगर्सला कंप्लीट बनवत आहे. घरी वर्क फ्रॉम होम करताना ‘मी टाईम’ साठी हा स्पेशल आणि आरामदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT