Monsoon Fashion Tips Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Fashion Tips: पावसाळ्यात 'या' रंगाच्या साड्या नेसल्यास मिळेल सुंदर लूक

पुजा बोनकिले

Monsoon Fashion Tips: पावसाळा उत्साह आणि ताजेपणा आणतो. परंतु या दिवसांमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या रंगाचे किंवा कोणत्या पद्धतीचे कपडे घालावे हे अनेकाना कळत नाही. जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या लग्नसमारंभात जात असाल आणि साडी नेसणार असाल तर पुढील रंगांचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमचा लूक फ्रेश दिसेल

लाल

लाल रंग नेहमीच शक्ती आणि उर्जेचे प्रतीक आहे. पावसाळ्यात या रंगाचे एथनिक कपडे परिधान केल्यास तुम्ही फ्रेश दिसाल. लाल रंगाच्या साड्या, सूट किंवा कुर्त्या प्रत्येक प्रसंगी तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

जांभळा

जांभळा हा शाही आणि आकर्षक रंग आहे. एथनिक ते वेस्टर्न अशा सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये हा रंग छान दिसतो. जांभळ्या रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसाल.

पिवळा

पिवळा रंग आनंदी आणि ऊर्जेचे प्रतिक आहे. हा रंग पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लूक देतो. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पिवळा रंगाचा ड्रेस, साडी किंवा अनारकली परिधान करू शकता.

केशरी

केशरी रंगही पावसाळ्यासाठी तुम्हाला फ्रेश लूक देतो. हा रंग उत्साहाचे प्रतिक आहे. तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात केशरी रंगाचे एथनिक कपडे घालू शकता. तसेच हा रंग सौंदर्यासोबत आत्मविश्वास वाढवतो.

हिरवा

हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि पावसाळ्यासाठी सर्वोत्तम रंग आहे. हा रंग केवळ डोळ्यांना शांत करत नाही तर तुम्हाला फ्रेश लूक देतो. ग्रीन सिल्क किंवा कॉटन साडी , कुर्ती किंवा लेहेंगा तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

निळा

पावसाळ्यात निळा रंग खुप सुखदायक दिसतो. हा रंग शांतता आणि स्थिरतेचे प्रतिक आहे. हा रंग तुम्ही साडी किंवा सूटसोबत ट्राय करू शकता.

गुलाबी

गुलाबी रंग हा कोमलतेचे प्रतिक आहे. पावसाळ्यात हा रंग फ्रेश लूक देतो. डार्क असो वा लाइट प्रत्येक रंग आकर्षक लूक देतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Violence: अकोल्यात तणाव! दोन गटात राडा, जमावाने दगडफेक करुन कार पेटवल्या

Rahul Gandhi Video: दलितांच्या घरात काय बनतं? राहुल गांधींनी जाणून घेतली खाद्यसंस्कृती, कोल्हापुरात स्वतः बनवलं जेवण

Raj Thackeray: "राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"; राज ठाकरेंचा घणाघात

Stock Market Crash: चार राज्यातील विधानसभेत भाजपचा पराभव झाला तर शेअर बाजाराचे काय होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

भारताला जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या Dipa Karmakar ची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक

SCROLL FOR NEXT