checks short shirt trends sakal
लाइफस्टाइल

आरामदायी... पण स्टायलिश

सकाळ वृत्तसेवा

- पृथा वीर

हल्लीच्या फॅशन ट्रेंड्समध्ये पारंपरिक आणि आधुनिक शैलींचे मिश्रण बघायला मिळते. ज्यामध्ये स्टाइल तर आहे; पण टिकाऊ फॅब्रिक आणि कम्फर्ट याची काळजी घेऊनच इंडो-वेस्टर्न ट्रेंडची कलेक्शन्स लक्ष वेधतात. यात प्रामुख्याने बोल्ड प्रिंट स्टाइल ज्यामध्ये फ्लोअर प्रिंट, नेचर प्रिंट, चेक्स प्रिंटसह हिरवा, गुलाबी, आकाशी निळा, पीच कलर यांचा आवर्जून समावेश केला जातो.

चेक्स शॉर्ट शर्ट कायम ट्रेंडमध्ये राहणारा ट्रेंड. चेक्स म्हणजे जेंडर न्यूट्रल ट्रेंड, जो महिला व पुरुष दोघांनाही छान दिसतो आणि प्रेझेंटेबल वाटतो. हे शर्ट कॉटन, लिनन, खादी कॉटन अशा विविध प्रकारांत उपलब्ध असतात. अशा शर्टमध्ये न्यूट्रल रंगांवर म्हणजे पांढरा, हिरवा आणि नेव्ही ब्लू कलर अशा रंगांवर भर दिला जातो. हे रंग प्रत्येक रंगाच्या बॉटमसोबत चांगले दिसतात.

या शर्टवरील छोटे चेक्स स्मार्ट लुक देतात आणि मोठे चेक्स कॅज्युअल लूक देतात. तुम्ही ब्राईट कलर टाळत असाल तरी हरकत नाही. चेक्समध्ये डार्क रंगसुद्धा छान दिसतात. यात काळा, नेव्ही ब्लू, केशरी, टेंजेरिन लाल आदी चमकदार रंग निवडता येतात. याच वैशिष्ट्यांमुळे चेक्स शर्ट नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. फुल स्लीव्ह्‌ज आणि हाफ स्लीव्ह्‌ज हे दोन्हीही पर्यात यात आहेत‌.

बोल्ड प्रिंटचे शर्ट व फॉर्मल पॅंट हा महिलांसाठी खूपच खास असा पर्याय आहे. ऑफिसवेअर म्हणूनही आणि कॅज्युअल वेअर म्हणूनही हा ड्रेस कोड छान दिसतो. यामध्ये व्हिंटेज प्रिंट, फ्लोअर प्रिंटमध्ये गडद आणि फिकट असे दोन्ही रंग छान दिसतात.

इतर शॉर्ट शर्टमध्ये इंडो-वेस्टर्न ड्रेस, स्कर्ट आणि टॉपमध्ये स्टेटमेंट बाही खूप लोकप्रिय झाली आहे. स्टेटमेंट बाहीमध्ये पफ स्लीव्ह्‌ज, रफल्ड लेयर्स आणि बलून स्लीव्ह्‌ज या डिझाईन्स पारंपरिक पोशाखांना पाश्चिमात्य ट्विस्ट देतात. दर काही वर्षांनी फॅशन ट्रेंड पुन्हा परत येतो.

म्हणूनच सध्या फ्लॅशनचे फ्लॅशबॅक झाले आहे. यावर बोल्ड विंटेज लूकचा प्रभाव असून कॉटन पॅन्ट, खादी कॉटन, कार्गो पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट, पलाझो, मदर जीन्स, बॉयफ्रेंड जीन्स, बॅगी जीन्स यांसारखे कॅज्युअल पोशाख आता दैनंदिन वॉर्डरोब स्टेपल बनले आहेत.

तुम्ही काय परिधान करता त्यात आत्मविश्वास आणि आरामदायक वाटणे हे महत्त्वाचे.

फॅशनला जोड तंत्रज्ञानाची

हल्ली फॅशनला तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. टेक-इंटिग्रेटेड ट्रेंड येऊ पाहत आहेत. उदाहरणार्थ, अशी जाकीटं किंवा शर्ट मिळतात, जी तुम्हाला तुमच्या फोनशी थेट कनेक्ट करून देतात. तुमच्या शरीराच्या तापमानावर अवलंबून असणारी विशेष फॅब्रिक्सही हळूहळू उपलब्ध होऊ लागली आहेत. तुमचा मूड बदलला, की कपड्यांचे रंग बदलतील असंही संशोधन सुरू आहे. तुमच्या पॉकेट्स किंवा कपड्यांना फिटनेस ट्रॅकर्स लावण्याचं तंत्रज्ञानही विकसित होऊ लागलं आहे. हे थोडंसं फिल्मी किंवा कल्पनारंजन वाटत असलं, तरीही पुढच्या काही वर्षांमध्ये या गोष्टी प्रत्यक्षात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

AUS vs IND Test: बुमराला शांत ठेवा अन्‌ भारताविरुद्ध मालिका जिंका! कॅप्टन कमिन्सचा ऑस्ट्रेलिया टीमला सल्ला

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Gold Return: सोन्याची चमक वाढली; गेल्या एका वर्षात दिला 'गोल्डन रिटर्न', पहा 14 वर्षांचा इतिहास

Cleaning Tips: कमी वेळेत अन् जास्त मेहनत न घेता स्लायडिंग विंडो होतील स्वच्छ, फक्त वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT