Father's Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Father's Day 2023 : महागडी भेटवस्तू नाही तर प्रत्येक वडिलांना मुलांकडून या 5 गोष्टींची अपेक्षा असते

वडिलांना आजच्या दिवशी गिफ्टसह या ५ गोष्टी बोलायला विसरू नका.

साक्षी राऊत

Father's Day 2023 : फादर्स डे निमित्त मुले आपल्या वडिलांना काहीतरी भेटवस्तू देण्याचा प्लान करत असतात. मात्र गिफ्टसोबतच काही गोष्टी वडिलांना तुम्ही बोलल्यास ते एवढे खुश होतील की त्यांचा आनंद गगनात मावेनासा असेल. तेव्हा वडिलांना आजच्या दिवशी गिफ्टसह या ५ गोष्टी बोलायला विसरू नका.

वडील हे जीवनात सर्वात मजबूत आधारस्तंभ मानले जातात. ते केवळ आपल्याला पाठिंबाच देत नाहीत तर आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रमही करतात. आईचे प्रेम साऱ्या जगाला माहीत असले तरी वडिलांच्या हृदयात दडलेले प्रेम कधी कधी मुलांनाच कळत नाही.

बहुतेक मुलांना त्यांचे वडील ताठर व्यक्तीमत्वाचे वाटतात. पण वडील खरंच असे असतात का? मुलं जितक्या सहजतेने आईला मिठी मारतात तेवढ्या सहजतेने कधी तुम्ही बाबाला मिठी मारता काय? तेव्हा या फादर्स डे ला वडिलांना गिफ्ट देण्याबरोबरच प्रेमाची मिठी मारा. मिठी मारल्याचा आनंद हा महागड्या गिफ्टपेक्षा कितीतरी पटीने मोठा असेल. याशिवाय तुम्ही काही गोष्टी वडिलांना बोलू शकता, ज्या प्रत्येक वडिलांना त्यांच्या मुलांकडून म्हातारपणात ऐकायच्या असतात.

1) थँक्स आभार

जेव्हा आपल्याला कोणतीही अडचण येते किंवा जवळचे पैसे संपतात तेव्हा आपण थेट आपल्या वडिलांना मदतीसाठी विचारतो. सहज आपल्या सगळ्या गरजांचा विचार करणारे आपले वडील त्या पूर्ण करण्यासाठी फार कष्ट घेत असतात.

2) तुम्ही सर्वात बेस्ट होता

आपल्या वडिलांमुळे आपण लहानपणापासून सुरक्षित राहातो. वडील आणि मुलाचं नातं किती अतूट आहे हे वडिलांना स्वत: तुम्ही सांगा. तुमच्यासाठी ते कसे बेस्ट आहे हे त्यांना फादर्स डे च्या निमित्ताने सांगा. त्यांना फार आनंद होईल. (Lifestyle)

3) तुम्ही आमची ताकद आहात

वडील मुलांना पुढे जाण्यास बळ देतात. त्यांच्यामुळे आपण यशाची उंची गाठण्यास सक्षम बनतो. तेव्हा त्यांना सांगा की बाबा तुम्ही आमची ताकद आहात. तेव्हा आमच्या आयुष्यात तुमचं महत्व किती आहे त्यांना सांगा.

4) मी आहे तुम्ही चिंता करू नका

प्रत्येक वडिलांना वाटतं की म्हातारपणात त्यांच्या मुलांनी त्यांना आधार द्यावा. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाती घ्याव्या असे त्यांना सतत वाटत असते. त्यांना आजच्या दिवशी 'मी आहे तेव्हा तुम्ही चिंता करू नका' असे आश्वासन द्या. (Father's Day)

5) तुमच्याशिवाय मी काही नाही याची त्यांना जाणीव करून द्या

तुम्ही आज ज्या पदावर आहात ते फक्त तुमच्या कुटुंबियांमुळे आणि तुमच्या वडिलांमुळे आहात याची जाणीव त्यांना करून द्या. त्यांना फार बरे वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT