Father's Day Special: Sakal
लाइफस्टाइल

Father's Day 2024: तू लढ मी तुझ्या पाठीशी उभा आहे’ मुलांसाठी अविश्रांत कष्ट करतात ते म्हणजे वडील

सकाळ वृत्तसेवा

डॉ. वैजनाथ कदम

Father's Day 2024: आपल्या वाट्याला आलेले ढोरकष्ट किमान आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत. आपल्या मुलांचे जीवन आपल्यापेक्षा अधिक सुंदर बनावे. यासाठी अविश्रांत कष्ट करतात ते म्हणजे ‘वडील’ असतात.

वडील ही व्यक्ती खरेच मुलांसाठी देवता समानच असते.‘तू लढ मी तुझ्या पाठीशी उभा आहे’, असे म्हणून मुलांना धीर देत त्यांच्या आयुष्याला वळण देण्यासाठी जी व्यक्ती स्वतः खस्ता खाते, ती व्यक्ती म्हणजे वडील असते. वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन मुलांवर रागावणारे वडील तितकेच हळवेही असतात. रागाच्या भरात मुलांच्या पाठीवर मार देणारे परंतु, थोड्याच वेळाने पाठीवर उमटलेला वळ तपासून पाहून त्याला प्रेमाने जवळ घेत कुरवळणारे वडील म्हणजे मुलांसाठी मायेचा झराच.

समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात प्रवाशांना सुरक्षित किनाऱ्यापर्यंत पोचवण्याचे काम जसे जहाज करते अगदी त्याच पद्धतीने आयुष्यात कितीतरी हाल अपेष्टा सहन करत, मान-अपमानाचे हेलकावे पचवत मुलांना सुरक्षित यशाच्या किनाऱ्यापर्यंत पोचवण्याचे कार्य हे वडील करीत असतात. मुलींना तर तिच्या आईपेक्षाही जास्त माया लावणारे वडील मातृहृदयी असतात. लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी पाठवताना वडिलांच्या मनाची होणारी घालमेल शब्दात सांगता येणे कठीणच.

मुलांच्या भविष्यासाठी वडील स्वतः खस्ता खातात, स्वतः खडतर वाटेवर चालून मुलांसाठी सोपा रस्ता तयार करीत असतात.वडिलांनी मुलांवर केलेल्या उपकारांची मुलांनी खरेच जाणीव ठेवायला हवी. वडिलांच्या आशीर्वादाची उणीव मुलांना कधीही भासू नये अशा पद्धतीचा सेवाभाव वडिलांच्या म्हातारपणात मुलांचा असायला हवा.

आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याची काळजी घेऊन त्यांना उत्कृष्ट शिक्षणाकडे वळवण्यासाठी हव्या त्या गोष्टीची पूर्तता करणारे वडील मुलाला यशाच्या उच्च शिखरावर नेतात. हा क्षण बघण्यासाठीच त्यांचे डोळे आसुसलेले असतात. वडिलांचे एकच स्वप्न असते की मुलांनी आपल्यापेक्षा मोठे व्हावे. वृद्धपणी आपल्यासाठी आधाराची काठी व्हावे. वडिलांच्या या स्वप्नाची पूर्तता मुलांनी करायलाच हवी.

स्वराज्य निर्माण करणे हे स्वप्न खरे तर शहाजीराजांचे होते. परंतु, शहाजीराजे हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. आपण पाहिलेले स्वराज्य निर्मितीचे स्वप्न आपल्या मुलाने तरी पूर्ण करावे यासाठी अविरत खस्ता खात स्वराज्य निर्मितीसाठी अनुकूल परिस्थिती शहाजीराजांनी निर्माण करून दिली. तेव्हा कुठे शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करता आले. या ऐतिहासिक संदर्भाची जाणीव आजच्या प्रत्येक मुला-मुलीने ठेवायला हवी. मुलांना विजेता बनवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करते की व्यक्ती म्हणजेच वडील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT