Fenugreek Water as Hair Fall Remedies esakal
लाइफस्टाइल

Hair Fall Solution: मेथीचे पाणी केस गळतीवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या कसे वापरावे

Hair Fall Solution: आजकालची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती

Lina Joshi

Hair Fall Remedies : आजकालची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस गळती. लोकांची जीवनशैली, योग्य पौष्टिक आहार न घेणे, मद्यपान, धूम्रपान आणि प्रदूषणामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

समस्यांच्या या लांबलचक यादीत केसांच्या समस्या सर्वात वरती आहेत. आज 10 पैकी 8 लोकं केस तुटणे, डॅमेज आणि गळणे यामुळे त्रस्त आहेत.

केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे शैम्पू आणि सौंदर्य उत्पादने वापरतात. या सर्व गोष्टी केस गळणे, डॅमेज आणि तुटणे रोखण्याऐवजी वाढू शकतात, कारण ते बनवण्यासाठी अनेक प्रकारची केमिकल वापरली जातात.

जर तुम्हीही केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एक खास घरगुती उपाय सांगणार आहोत, जो केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे मेथीचे पाणी. चला जाणून घेऊया केसांसाठी मेथीचे पाणी कसे वापरावे.

मेथीच्या पाण्याचे पोषक घटक

मेथीच्या पाण्यात व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि आयर्नसारखे अनेक पोषक घटक आढळतात. मेथीचे हे पौष्टिक घटक केस गळणे थांबवण्यासोबतच त्यांना दाट बनवण्यासही मदत करतात.

केसांसाठी मेथीचे पाणी कसे बनवायचे

साहित्य

1. मेथी - 50 ते 60 ग्रॅम

2. पाणी - 1 ग्लास

3. केसांचे तेल - 5 ते 6 थेंब

कसे बनवावे

1. सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात 1 ग्लास पाणी घ्या.

2. या पाण्यात मेथीचे दाणे टाका आणि रात्रभर भिजत ठेवा.

3. मेथीचे दाणे सकाळी पाण्याने गाळून वेगळ्या भांड्यात काढा.

4. यानंतर या पाण्यात केसांच्या तेलाचे काही थेंब टाका.

5. हे पाणी स्प्रे बाटलीत साठवा. तुमचे मेथीचे पाणी केसांसाठी वापरण्यासाठी तयार आहे.

केसांना मेथीचे पाणी कसे लावावे

1. केसांमध्ये मेथीचे पाणी वापरण्यापूर्वी शॅम्पू वापरा. शॅम्पूने स्काल्प स्वच्छ होतो आणि मेथीचे पाणी मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचते.

2. स्वच्छ केसांना वेगवेगळ्या भागात विभाजित करा. यानंतर त्यामध्ये मेथीचे पाणी फवारून किमान 1 तास राहू द्या.

3. केसांमध्ये मेथीचे पाणी फवारल्यानंतर हवे असल्यास पाण्याने केस धुवू शकता. याशिवाय, तुम्ही ते जसेच्या तसे ठेवू शकता.

4. जर तुम्हाला तुमच्या केसांवर मेथीचे पाणी फवारण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही ते हेअर मास्क किंवा शॅम्पूमध्ये मिसळून देखील वापरु शकता.

5. केसांच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना मेथीचे पाणी लावू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT