aditi rao hydri esakal
लाइफस्टाइल

Festive Fashion : लग्नात तूम्हीच गाजलं पाहिजे तर या राजकन्येकडून घ्या शाही फॅशन टिप्स!

हे एथनिक डिझाईनचे ड्रेस घालाल तर कौतूकाचा पाऊसच पडणार!

Pooja Karande-Kadam

Festive Fashion Tips: सध्या सर्वत्र नव्या वर्षाच उत्सव सुरू आहे. या नव्या सिझनमध्ये लग्नसराई जोरात सुरू आहे. त्यामूळे लग्नाला घालायचं काय? कोणती फॅशन करायची असा प्रश्न तूम्हालाही पडला असेल तर आज आम्ही तूमच्यासाठी काही भन्नाट स्टाईल्स घेऊन आलोय.

 सर्वांनी तूमच्याकडे पहावे, तुमचं कौतूक करावं, तूमची ड्रेस सुंदर, स्टायलिश आणि कम्फर्टेबल असावा, असे प्रत्येकीलाच वाटते. त्यामूळे प्रत्येक तरूणी सोशल मिडीयावर नव नवी स्टाईल, ड्रेस शोधत असते.तूम्हीही अशाच फॅन्सी स्टाईलच्या शोधात असाल तर तूमचा हा शोध संपला आहे.

भारतातील एका शाही घराण्यातील राजकन्येनेकडूनच तूम्ही टीप्स घ्या. ज्यामूळे तुम्ही घरात ठेवलेल्या एका छोट्या पार्टीसाठी ट्रेडिशनल, कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूक कॅरी करू शकाल. या राजकन्येचे नाव अदिती राव हैदर असे आहे. ती बॉलिवूडमधील एक ग्लॅमरस अभिनेत्री देखील आहे.

अदितीही हैद्राबाद येथील राजघराण्यातील असल्याची माहिती खूप कमी लोकांना आहे. अदितीच्या वडिलांचं नाव एहसान हैदरी आणि आईचे नाव विद्या राव आहे. ती मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. त्यामूळे लग्नात मिरवताना करता येईल असा शाही लुक तूम्ही तिच्याकडून शिकू शकता.

अदितीने काही फोटोज सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. ती नेहमीच सोशल मिडियावर पोस्ट करत असते. आताही तिने शेअर केलेले फोटोज चर्चेत आले आहेत. अदितीकडे एक स्टाईल आयकॉन म्हणून पाहिले असता लक्षात येईल की ती नेहमीच वेगळं काहीतरी करत असते. आताही तिने इंडो-वेस्टर्न लुक ट्राय केलाय. तिच्या या फॅशनची कॉपी करा आणि लग्न गाजवा.

इंडो वेस्टर्न जंपसूट

जर तुम्हाला साडी किंवा ट्रॅडीशनल अटायर घालणे कंफरटेबल वाटत नसेल. तर तुम्ही घरच्या घरी होणाऱ्या समारंभात या प्रकारच्या इंडो-वेस्टर्न जंपसूटची निवड करू शकता. आपण ब्रोकेड किंवा सिल्क फॅब्रिक पॅटर्नवर टेलरसह जंपसूट वापरू शकता. यावर तुम्ही फंकी ज्वेलरी घालू शकता. हे एकदम स्टायलिश आणि सुंदर आणि कमीत कमी दिसेल.

हळदी समारंभ 

जर तूम्हाला एखाद्या लग्नात हळदीसाठीचा लुक हवा असेल. तर आदीती सारखा लुक करा. हळदीच्या कार्यक्रमासाठी बहुतांश जण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. या दिवशी तूम्ही एखादी पारंपरिक साडी नेसू शकता. साडी सिल्क पॅटर्नमधील असल्यास उत्तम. कारण सिल्क साड्यांमध्ये फोटो चांगले येतात. तसंच अशा साड्या वजनामध्येही अतिशय हलक्या असतात.

या साडीवर तूम्ही माथा पट्टी आणि मांग टिका मॅच करू शकता. आदिती सारखेच ईअररिंग्स घालायला आणि छोटीशी टिकली लावायलाही विसरू नका.

अदिती प्रत्येक लुकमध्ये कमालच दिसते राव

प्लाझो सेट

प्लाझो सेट खूप ट्रेंडमध्ये आहेत. पण तुम्ही त्याला थोडा साधा आणि एथनिक लुक देऊ शकता. अदिती राव हैदरीने फ्लेर्ड प्लाझोसोबत शॉर्ट कुर्ती पेअर केली. तिच्या परफेक्ट फिगरमूळे हा लुक अगदी परफेक्ट दिसत आहे. या लुकवर तूम्हाला दुपट्टा घेण्याचीही काही गरज नाही.

मेहंदी कार्यक्रमासाठी स्पेशल

मेंदी फंक्शनसाठी साधारणतः गडद हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पण असे न करता हिरव्या रंगातील लाईट शेडचाही तूम्ही ड्रेपरी करू शखता. आदितीच्या या ब्राईडल लुक सारखे तूम्ही मैत्रिणीची, बहिणीची मेहंदी गाजवू शकता. या ड्रेसवर मेकअप आणि दागिने देखील आकर्षक निवडा.

फंक्शल लुकसाठी अशी फॅशन करा

अनारकली सूट

अनारकली सूट म्हटलं की अनेक कळ्या असलेला लांबच लांब टॉप आठवतो. पण, तसं नाहीय.तूम्हाला अनारकली ड्रेसमध्येही परफेक्ट दिसायचे असेल तर तुम्ही हा लुक कॉपी करा. फ्लोरल पॅटर्न आणि ब्राइट पिंक कलरमध्ये अदिती राव हैदरीचा हा अनारकली कुर्ता खूपच इंटरेस्टिंग दिसत आहे.

लग्नासाठी स्पेशल लुक

लग्नाच्या दिवशी ज्वेलरी मेकअप, हील्स इत्यादी गोष्टींची निवड आपल्या वेडिंग लेहंगा किंवा वेडिंग गाउननुसार करावी. शक्यतो वजनदार दागिने परिधान करणं टाळावं. कारण सध्या

या फोटोमध्ये अदितीची नथ पाहा. तिच्या चेहऱ्यावर ही नथ एकदम परफेक्ट दिसत आहे. तिची ही नथ खूपच वजनदार असतील तर कदाचित अदितीचे नैसर्गिक सौंदर्य नथीमुळे स्पष्ट दिसले नसते.

लग्नात अदितीचा हा दुल्हन लुक करा रिक्रीएट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT