Fitness Tips esakal
लाइफस्टाइल

Fitness Tips : सौंदर्य वाढवणारा कपालभाती प्राणायाम करताना या चुका टाळा; नाहीतर...

कपालभाती प्राणायाम आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे, पण योग्य प्रकारे केला जाणे आवश्यक आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Correct Way To Do Kapalbhati Pranayam : संपूर्ण फीटनेस हवा असेल तर व्यायाम, योगासनांबरोबर प्राणायाम करणपण तेवढंच आवश्यक असतं. यामुळे तुमच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्याबरोबरच सौंदर्यातही भर पडते. त्यामुळे श्वासावरील नियंत्रणाद्वारे केला जाणारा प्राणायाम वरवर पाहता जरी सोपा वाटत असला तरी, ते करण्याचे काही नियम व योग्य पद्धती आहेत. ज्याचं पालन होणं आवश्यक असतं. नाहीतर त्याचे दुष्परीणामही भोगावे लागू शकतात.

पण योग्य पद्धत माहीत नसल्याने बरेच लोक चुकीच्या पद्धतीनेच सराव करतात. कपालभाती रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाशी संबंधीत समस्या दूर ठेवण्यास मदत होते. अशावेळी काही खबरदारी घेणे गरजेचे असते.

कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत

  • चटईवर बसून ध्यान मूद्रा घ्या. डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवा. नंतर ओमचा उच्चार करत लयात श्वास घ्यावा आणि सोडावा.

  • दीर्घ श्वास घेऊन जोरात श्वास सोडावा. ही क्रिया करताना पोट आत आणि बाहेर होते की नाही याकडे नीट लक्ष द्या.

  • कोणताही प्राणायाम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सहज झाली पाहिजे.

  • क्षमतेनुसारच श्वास घ्यावा अन् सोडावा. कोणताही ताण न देता.

  • यामुळे तुमचे पोट मजबूत होण्यास, पचनाशी समस्या सुधारून चयापचय वाढण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT