लाइफस्टाइल

ऑफिसमध्ये चुकूनही अशा पद्धतीने नका वागू

देहबोलीतील 'या' चुकांमुळे सहकारी होऊ शकतात दूर

शर्वरी जोशी

समाजात वावरत असताना प्रत्येक व्यक्तीचं तुमच्याकडे बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे ऑफिस (office), पाहुणे किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी गेल्यावर आपल्या देहबोलीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच ऑफिसमध्ये वावरत असताना तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे यावरुन लोक तुमच्याविषयी अनुमान लावत असतात किंवा तुमच्या स्वभावाचा अंदाज बांधत असतात. त्यामुळे ऑफिसमध्ये बॉडी लँग्वेज (body language) परफेक्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच, ऑफिसमध्ये वावरताना कोणत्या प्रकारच्या गोष्टी टाळाव्यात किंवा कशा पद्धतीने लोकांशी संवाद साधावा ते पाहुयात. (five-body-language-mistakes-to-avoid-in-office)

१. खांदे वाकवून संवाद साधणे -

अनेक जणांना ऑफिसमध्ये बसताना किंवा एखाद्याशी संवाद साधताना खांदे वाकवून बोलायची सवय असते. परंतु, खांदे वाकवणे एकप्रकारे थकणे किंवा हारण्याचं लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये वाकून काम करत असाल तर तुमच्या एनर्जी नाही किंवा काम करण्यात तुम्हाला इंटरेस्ट नाही असं समजलं जातं. अनेकदा कामाच्या बाबतीत तुम्ही गंभीर नाही असाही तर्क लावला जातो. त्यामुळेच कधीही ऑफिसमध्ये काम करताना किंवा सहकाऱ्यांसोबत बोलताना खांदे ताठ ठेवावेत. तसंच प्रत्येक चर्चेत सहभाग घ्या.

२. लोकांकडे दुर्लक्ष करणे -

जर तुमच्याही कोणी संवाद साधत असेल तर त्यांच्याकडे लक्ष द्या. त्याच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा इतरत्र पाहत राहणे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे तुम्हाला संबंधित व्यक्तीच्या बोलण्यात रस नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे कोणाशीही संवाद साधताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. कोणाशीही संवाद साधताना आयकॉन्टॅक्ट अत्यंत गरजेचा असतो.

३. अत्यंत जवळ जाऊन बोलणे -

काही जणांना अत्यंत जवळ जाऊन बोलण्याची सवय असते. पण, तुमच्या याच सवयीमुळे समोरचा माणूस तुम्हाला कंटाळू शकतो किंवा इरिटेट होऊ शकतो. कधीही बोलत असताना एक ठराविक अंतर राखणं अत्यंत गरजेचं आहे.

४. हातांच्या हालचाली जास्त होणे -

कोणाशीही बोलत असताना बेसिक नियम फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट करणं आणि हातवारे कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही जण बोलत असताना प्रचंड हातवारे करतात. काही जण सतत बोटांची हाड मोडतात हे अत्यंत चुकीचं आहे. तुमच्या देहबोलीवरुनच समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल अंदाज बांधत असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

५. हाताची घडी घालणं -

जर तुम्ही हाताची घडी घालून बोलत असाल तर ती वेळीच बदला. ही डिफेंसिव्ह मुद्रा असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही गर्विष्ठ आहात, तुमच्यात अॅटिट्य़ूड आहे असा समज लोकांचा होता. म्हणूनच, सिनिअर्ससोबत बोलताना किंवा मिटींग घेताना सरळ उभं रहावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT