Five Physical Activities esakal
लाइफस्टाइल

5 Physical Activities : तुम्ही फिट आहात का? घरच्या घरी या टेस्ट करून पहा!

Easy exercises: तुम्ही या गोष्टी न थकता करू शकताय का?

Pooja Karande-Kadam

5 Physical Activities : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जवळपास ८५ टक्के लोक बैठ्या जीवनशैलीत काम करतात. म्हणजे त्यांच्या दैनंदिन कामाचं स्वरुप बैठं आहे.

त्यात कोणत्याही प्रकारच्या कष्टांचा समावेश नाही. अशा लोकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावू शकतात. कोणतेही श्रम नसलेली ही जीवनशैली रक्तदाब, लठ्ठपणा यांना आमंत्रण ठेणारी ठरते.

तुमचे शरीर निरोगी असेल तेव्हाच तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल. आजकाल फास्ट फुड आणि कोल्ड्रिंक्स खाऊन लोक जगत आहेत. ही त्यांना हाय क्वालिटीची लाईफ स्टाईल वाटते.

पण असं नाहीय. अशा खाण्यामुळे लोकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. बरेच लोक बाहेरून निरोगी दिसतात. परंतु ते आतून अनेक रोगांशी लढत असतात.

बिझी लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव यामुळे असे आजार होतात. की माणूस फिट दिसत असूनही तो विक असतो. तर तुम्हाला स्वत:च टेस्ट करायची असेल तर मग या गोष्टी घरच्या घरी करून पहा.

आपल्या तज्ञांनी अशा काही शारीरिक क्रिया सांगितल्या आहेत, ज्याद्वारे आपण सहजपणे शोधू शकाल की आपले शरीर तंदुरुस्त आहे की कमकुवत आहे.

एका पायावर उभं राहणे

एका पायावर उभं राहून जर तुम्ही संपूर्ण शरीराला एका पायावर स्टेबल करू शकत असाल. ही क्रिया करताना जर तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराचा समतोल एका पायावर ठेवला तर तुमचे शरीर तंदुरुस्त असल्याचे समजते.

यामध्ये जर तुम्ही तुमच्या शरीराचे वजन एका पायावर कमीत कमी 60 सेकंदांसाठी उचलू शकत असाल तर तुम्ही निरोगी आहात.  

परंतु जर तुम्ही 20 सेकंदांपेक्षा जास्त वेळ असे उभं राहू शकला नाहीत. तर, समजा तुमचे शरीर खूपच कमकुवत आहे आणि नंतर तुम्ही निरोगी असाल. अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागेल.

सतत उठून खुर्चीत बसणे

ही टेस्ट करण्यासाठी तुम्हाला एक खुर्ची लागेल. या खुर्चीवर बसताना तुम्ही सतत उभ रहा आणि लगेच खाली बसा.

जर तुम्ही 20 सेकंदात 10 वेळा उठून बसू शकता, तर तुमचे शरीर निरोगी आहे, परंतु जर तुम्ही हे करण्यात अपयशी ठरलात तर तुम्हाला व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण तुमच्या पायाचे शरीराचे स्नायू मजबूत असणे खूप महत्वाचे आहे.

पायाच्या बोटांना स्पर्श करणे

हे करण्यासाठी जमिनीवर बसून दोन्ही पाय सरळ करा. यानंतर, दोन्ही पायांच्या अंगठ्याला हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की लवचिक शरीर लवचिक धमन्या दर्शवते. तुमच्या जीवनशैलीमुळे तुमच्या धमन्या कडक होतात तेव्हा तुमच्या हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.

वेगाने पायऱ्या चढा

जर तुम्ही न थांबता सहज पायऱ्या चढू शकत असाल तर तुमचा वेळ आणि वयाआधीच मृत्यू होणं अशक्य आहे. संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांना पायऱ्या चढण्यास त्रास होतो त्यांच्या मृत्यूची शक्यता तिप्पट असते.

तसेच कर्करोगाचा धोकाही दुप्पट असतो. त्यामुळे तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करा, आहारात बदल करा, पौष्टीक आहार घ्या आणि फिट होऊन पुन्हा या गोष्टी करून पहा.

बदल करूनही या गोष्टीत तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT