Husband Wife Sex Problem esakal
लाइफस्टाइल

शारीरिक संबंधासाठी बायकोचा नकार? जाणून घ्या पाच कारणे

अनेक महिलांना शारीरिक संबंध त्रासदायक वाटतात

सकाळ डिजिटल टीम

जेव्हा तुम्ही शारीरिक संबंधासाठी उत्सुक असता तेव्हा तुमची बायको (Wife)तुमच्यापासून दूर जाते. असं घडतं का? याचं कारणं नेमंक काय असावं असं तुम्हाला वाटतं? अनेक महिलांना (Womens)शारीरिक संबंध (Sexcual Relationship) त्रासदायक वाटतात. त्यामागे अनेक कारणं असतात. तुमची इच्छा कितीही तीव्र असली तरी अशावेळी तिच्यावर न चिडता तिला समजून घेतलेत तर तुमचे हे नाते बहरू शकते. त्यासाठी योग्य कारणांचा शोध घ्या. संबधांमध्ये रस नसल्याची खालील कारणे असू शकतात.

partner

शारिरिक संबधात रस नसेल

प्रत्येकाला शारीरिक संबंधांची समान भावना नसते. काहींची गरज जास्त असते तर पार्टनरची कमी असते. तुमच्या बायकोला शारीरिक संबंधांमध्ये फारसा रस नसण्याचे हे एक कारण असू शकते. तुम्हाला किती शारीरिक संबंधांची गरज किती आहे हे बायकोला समजत नसेल. तर, तिच्याशी संवाद साधा. त्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो.

एखादा दबाव असल्यास

दबाव किंवा तणाव असेल तर लोकं चांगले काम करत नाहीत. तुम्हाला ती समाधान देत नाही, असं वाटत असल्याने कदाचित ती तुमच्याबरोबर पुरेशी संबंध ठेवत नसेल. तुम्ही तिला तिच्यामुळे ओझे वाटत नाही याची कल्पना द्या.

Relationship

भावनिक नाते नसणे

तुमची पत्नी तुमच्याशी भावनिक जोडलेली नसावी. त्यामुळेच ती ती तुमच्यापासून दूर असू शकण्याचे एक कारण असू शकते. बर्‍याच स्त्रिया भावनिक नाते शारीरिक संबंधापेक्षा महत्वाचे मानतात,

इतर समस्या

तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या असतील तर त्याचा परिणाम होऊन बायकोला त्रास होऊ शकतो. अशावेळी. नातेसंबंधात तिला काय चुकते आहे याबद्दल तिच्याशी संवाद साधा. यावर ठोस मार्ग काढल्याशिवाय तुमचे शारीरिक संबंध खुलू शकणार नाहीत.

तिला असुरक्षित वाटत असेल

बायकोला तिच्या शरीराविषयी असुरक्षित वाटत असेल तर ती तुमच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देण्याची शक्यता आहे. प्रेग्नंन्सीनंतर अनेक महिलांच्या शरीरात बदल होतो. स्ट्रेचमार्क येतात. अशावेळी तिला तुमच्याशी संबंध ठेवण्यास संकोच वाटण्याची शक्यता आहे. तसेच मुलं झाल्यावरही संबंधांमध्ये परिमाम होतो. अशावेळी तिला तुमच्याविषयी आणखी आश्वासक वाटेल यासाठी प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT