Gehraiyaan film 
लाइफस्टाइल

Gehraiyaan चित्रपटातून कपल्सनी शिकाव्या ५ गोष्टी!

हा चित्रपट आयुष्यातील अनेक भावनिक समस्यांना हात घालतो

सकाळ डिजिटल टीम

दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या 'गहराइयां' चित्रपटाची सध्या तरूणाईत चर्चा आहे. अनेकांना तो चित्रपट त्यातील मॅसेजमुळे खूप आवडलाय तर अनेकांना हा चित्रपट अजिबात आवडलेला नाही. पण हा चित्रपट आयुष्यातील अनेक भावनिक समस्यांना हात घालतो. त्यामुळेच कि काय अनेक कपल्सना (Couple) हा चित्रपट आवडलाय. या चित्रपटातून कपल्सनी काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

couple

१) पार्टनरला गृहीत धरू नका (Don’t take your partner for granted)- आयुष्यात कायम आपल्या जवळ असणारी जिवाभावाची व्यक्ती हवी असते. अशी व्यक्ती मिळाल्यावर आपल्याला आकाश ठेंगणे होते. त्या व्यक्तीशी आपण अनेक गोष्टी शेअऱ करतो. पण या व्यक्तीला आपण गृहीत धरायला लागलो तर त्याचे तुमच्यावरील प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्याविषयी वाटणारी ओढ कमी होईल. प्रेम मिळणे, कोणीतरी आपली कदर करणे ही मानवी वृत्ती आहे. पण तसे झाले नाही तर त्याचा तुमच्यातला इंटरेस्ट संपेल. म्हणून नात्यात एकमेकांना गृहीत धरू नये.

२) संवाद टाळू नका- (Don’t skip on communication)- नाते शेवटपर्यंत टिकवायचे असेल तर, दोघांच्यात संवाद असणे महत्वाचे आहे. तुम्हाला काही वाटत असेल आणि ते सांगता येत नसेल तर ते चुकीचे आहे? याने गैरसमज होऊ शकतो. उलट तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे समोरच्याला आपोआप कळले आहे असे कधीही समजू नका. जे वाटते ते स्पष्ट बोला. बोलण्यामुळे, संवाद साधल्यामुळे बऱ्याच गोष्टी एकमेकांविषयी कळतात.

Partner Relation

३)पार्टनरच्या आवडी निवडी छंदामध्ये रस घ्या (Take interest in your partner’s likes, dislikes, interests)- तुम्ही आणि तुमचा पार्टनर एकमेकांपेक्षा खूप वेगळे असणार नक्की. तुमच्या आवडीनिवडीही वेगळ्या आहेत. पण तुम्ही एकमेकांच्या छंद आणि आवडीनिवडीत थोडा तरी रस घ्यायला हवा. हे रोज शक्य नसले तरी कधी कधी स्वारस्य दाखवायला हरकत नाही. अशामुळे तुमच्यातले बॉंडिंग वाढू शकते. पण तुम्ही एकमेकांच्या कुठल्याही गोष्टीत रस दाखवला नाहीत तर तुम्हाला एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवायला फारसा वेळ मिळणार नाही.

४) कोणतेही नाते परिपूर्ण नसते ( No relationship works on a straight line)- कोणतेही नाते परिपूर्ण नसते. प्रत्येक नात्यात वाद, भावनिक गोंधळ आणि गुंतागुंत निर्माण होतेच. माझ्याबरोबरच असे का होते , हा विचार करणे चुकीचे आहे. कारण प्रत्येकाला समस्यांचा सामना करावा लागतो. नातेसंबंध तुम्ही कशाप्रकारे हाताळता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

Couple

५) परिस्थिती बदलू शकते (Circumstances can change you)- तुम्ही कसे वागायचे यासंर्भात कितीही प्लॅनिंग केले तरी, परिस्थितीमुळे अनेकदा तुम्हाला मार्ग बदलावा लागू शकतो, तुम्ही तुमच्या भावनांप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीशी वागता. व्यवहार करता. त्यामुळे पुढची परिस्थिती कशी असेल तर आधीच ठरवता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT