Summer Hair Care : उन्हाळ्यातील प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे त्वचा आणि केसांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केसांची ही खास काळजी घेणे गरजेचे आहे. ऊन, धूळ आणि घामामुळे केसांमधील आर्द्रता हिरावून घेतली जाते. त्यामुळे, केस कोरडे आणि खराब दिसू लागतात. सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केवळ आरोग्यच नाही तर केसांनाही हानी पोहचते.
सूर्याच्या या अतिनील किरणांमुळे केसांमधील क्युटिकल नष्ट होतात. ज्यामुळे, केस तुटू लागतात आणि उन्हामुळे केसांचा रंग ही उडतो. त्यामुळे, केस मोठ्या प्रमाणात खराब होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही केसांची खास काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्सची मदत घेऊ शकता. या टिप्समुळे तुमचे केस उन्हाळ्यातही छान राहू शकतील. कोणत्या आहेत या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
केस कोरडे होणे आणि केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हेअर मास्कचा वापर करू शकता. हेअर मास्क हा केसांसाठी एक प्रभावी उपाय आहे. हेअर मास्कमध्ये शीया बटर आणि आर्गन ऑईलसारखे डीप कंडिशनिंग एजंट असतात. ज्यामुळे, केसांना छान फायदा होतो. हा हेअर मास्क तुम्ही केसांना शॅंम्पू करण्यापूर्वी लावू शकता किंवा केसांना शॅंम्पू केल्यानंतर ही केसांना लावू शकता.
केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना शॅंम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा अवश्य वापर करा. यामुळे, केस मुलायम होण्यास मदत होते आणि ओले केस वाळल्यानंतर त्यातील गुंता कमी होतो. शिवाय, केसांना छान पोषण ही मिळते. या व्यतिरिक्त केसांना कंडिशनर लावल्यामुळे केसगळती आणि केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या कमी होते.
उन्हाळ्यात केसांची देखभाल करण्यासाठी आणि केसांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फचा अवश्य वापर करा. स्कार्फचा वापर केल्यामुळे केसांचा आणि त्वचेचा उन्हापासून बचाव केला जाईल. त्यामुळे, उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना स्कार्फ अवश्य बांधा, यामुळे केस खराब होणार नाहीत.
उन्हाळ्यात तुमच्या केसांसाठी रूंद-दात असलेला कंगव्याचा वापर अवश्य करा. कंगव्याने केस विंचरण्यापूर्वी केसांना हेअर सीरम लावा. यामुळे, केस तुटणार नाहीत. ओल्या केसांवर कधीच कंगव्याचा वापर करू नका, हे नेहमी लक्षात ठेवा. केस वाळल्यानंतर ते कंगव्याने विंचरा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.