Food for Digestion: Sakal
लाइफस्टाइल

Food For Digestion: उन्हाळ्यात पचनसंस्था राहील सुरळित, आजच 'हे' 5 पदार्थ खाणे टाळा

Food For Digestion In Summer: उन्हाळ्यात पचनसंस्था सुरळित ठेवायची असेल तर आजपासूनच पुढील पदार्थांचे सेवन टाळावे.

पुजा बोनकिले

Food For Digestion avoid these food for healthy digestion

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी विविध पदार्थांचे सेवन केले जातो. यामध्ये आईस्क्रिम, थंडपेयांचे यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. या दिवसांमध्ये गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात. यामुळे पुढील स्ट्रीट फुड खाणे टाळावे. यामुळे उन्हाळ्यात देखील तुमची पचन संस्था सुरळित कार्य करेल.

  • सॉस किंवा चटणी

उन्हाळ्यात सॉस आणि चटणी खाणे हानिकारक ठरू शकते. यामुळे जास्त मसाले असलेला सॉस किंवा चटणी खाऊ नका. तसेच ताजे असेल तरच खावे. उन्हाळ्यात जास्त मसाला असलेले सॉस किंवा चटणी खाल्ल्यास छातीत जळजळ आणि अॅसिडिटी वाढू शकते. यामुळे खाताना काळजी घ्यावी.

  • तळलेले पदार्थ

उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढू शकतात.यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते तसेच पचायला खुप अवघड असते. जर तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल तर गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.

  • चहा- कॉफी

उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे अतिसेवन केल्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्ही गॅस, ॲसिडीटी आणि ब्लोटिंगचे शिकार व्हाल आणि पचनक्रियेला अडचणींना सामोरे जावे लागते.

  • चिरलेले फळ आणि भाज्या

जास्त वेळ चिरून ठेवलेले फळ आणि भाज्या कोणत्याही ऋचूमध्ये खाऊ नका. खास करून उन्हाळ्यात खाणे घातक ठरू शकते. यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळत नाहीत उलट त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे विषबाधा देखील होण्याचा धोका वाढतो.

  • गोड पदार्थ

उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी आणि मिल्कशेक शरीराला थंडावा देतात. पण या दिवसांमध्ये या गोष्टींमध्ये बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी त्यांची योग्य साठवणूक करणे महत्वाचे असते. अन्यथा याचे सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT