Healthy Teeth sakal
लाइफस्टाइल

Healthy Teeth: निरोगी आणि स्वच्छ दात हवेत? मग ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

दात आणि हिरड्यांना निरोगी ठेवतात हे पदार्थ

Aishwarya Musale

आपल्या सर्वांना निरोगी दात आणि हिरड्या हवे असतात. यासाठी, योग्य ब्रशिंग आणि फ्लॉसिंगचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की हे आपल्या खाण्याच्या सवयींवर देखील अवलंबून असते. दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळे आहारात घेणे खूप महत्वाचे आहे. 

म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला आहाराशी संबंधित काही सवयींबद्दल सांगत आहोत, ज्या दातांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

1. फळे आणि भाज्या खा

आपल्या आहारात जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांचा समावेश करा. हे तुमच्या दातांचे सर्वात चांगले मित्र आहेत. हे तुमचे दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवतात. संत्रे आणि द्राक्षासारखी फळे व्हिटॅमिन-सीच्या उच्च पातळीसह दात निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यात असलेले नैसर्गिक आम्ल दात स्वच्छ ठेवते.

2. पाणी - आहाराचा एक आवश्यक भाग

दररोज पुरेसे पाणी प्या. पाण्यासोबतच तुम्हाला तुमच्या आहारात पाणीयुक्त पदार्थांचा समावेश करावा लागेल. हे तुम्हाला चांगले हायड्रेट करतात. शरीराच्या योग्य हायड्रेशनमुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते.

3. डेयरी प्रोडक्‍ट

दूध, चीज आणि दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तुमच्या दात आणि हाडांसाठी चांगले असतात. त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट असतात, जे तुमच्या दातांना इतर पदार्थांमुळे होणारे नुकसान दुरुस्त करण्यात मदत करतात.

4. ग्रीन टी अँड ब्लॅक टी

हे दोन्ही प्रकारचे चहा आरोग्यासाठी चांगले असतात हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की ते ओरल हेल्थसाठीही चांगले असतात. त्यात पॉलीफेनॉल नावाची रसायने असतात, जे खराब बॅक्टेरियांना वाढण्यापासून आणि दात आणि हिरड्यांना नुकसान होण्यापासून रोखतात.

साखरयुक्त पदार्थ टाळा किंवा कमी करा

लॉलीपॉप, कॅरॅमल्स आणि गोड साखरेचे ड्रॉप्स यांसारख्या कँडीज किंवा मिठाई टाळा जे तुमच्या दातांना जास्त काळ चिकटून राहतात. सॉफ्ट ब्रेड आणि बटाटा चिप्स यांसारख्या स्टार्चयुक्त पदार्थांपासून सावधगिरी बाळगा, ते तुमच्या दातांमध्ये अडकू शकतात.

याव्यतिरिक्त, शुगर ड्रिंक, विशेषतः कार्बोनेटेड ड्रिंक कमीत कमी करा. त्यात भरपूर साखर असते, ज्यामुळे तुमच्या दातांच्या इनॅमलला हानी पोहोचते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: अनेक हायप्रोफाईल हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव; प्रतिबंधित संघटनेशीही संबंध, पोलिस तपासात महत्त्वाची माहिती उघड

Nagpur News : फडणवीसांच्या संपत्तीत पाच वर्षांत फक्त ११ लाखांची वाढ; तर अमृता फडणवीस यांच्यावर आहे लाखोंचे कर्ज

Maharashtra Assembly Election 2024 : तिकीट वाटपाचा घोळ! पुणे शहरातील संघ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खलबत

Manoj Jarange Patil : केवळ २४ तासांत ८०० इच्छुकांच्या मुलाखती; मनोज जरांगे यांनी जाणून घेतली मते

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT