Foods For Healthy Skin: तरूण रहायला, दिसायला कोणाला आवडत नाही. चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या मेकअपने लपवण्याचा प्रयत्न सगळेच करतात. पण योगा, व्यायाम आणि ट्रिटमेंटने त्वचा टवटवीत करण्यात जास्त फायदा आहे. आता हे कसं करायचं तर त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शरीराला पुरक असलेले पदार्थ खायला हवेत.
तुम्हाला चिरंतन तरूण रहायला कोलेजन हे प्रथिन मदत करते. आपल्या त्वचेला टाईट राहण्यासाठी कोलेजनचा फायदा होतो. कोलेजन हे आपल्या शरिरात आढळणारे सर्वात सामान्य प्रथिने आहे. हे आपल्या शरिराच्या अनेक भागांमध्ये आढळते जसे की, चरबी, सांधे आणि लिगामेंट्स इत्यादी भागांमध्ये आढळते. (Foods For Healthy Skin: Collagen will help to look young, make these changes in diet)
कोलेजन हे आपल्या शरीरातील विविध भाग एकमेकांना जोडण्यास मदत करते आणि आपल्या हाडांच्या संरचनेच्या मजबूतीसाठी हे महत्वाचे आहे. याला सामान्यतः शरिराचे सिमेंट देखील म्हणतात जे शरिराच्या भागांना एकत्र बांधून ठेवते. जेव्हा कोलेजनची पातळी निरोगी असते, तेव्हा कोलेजनने समृद्ध असलेल्या पेशी मजबूत आणि तरुण असतात. (Healthy Food)
टोमॅटो
टोमॅटो हा आपल्या किचनमधील महत्वाचा घटक आहे. भाजी असो किंवा वरण टोमॅटो लागते म्हणजे लागतेच. टोमॅटो खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्वचा निरोगी राहते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. हे हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. हे पिगमेंटेशन, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करते.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आवळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्याच्या सेवनाने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.
याशिवाय संत्री आणि लिंबू सारख्या पदार्थांचा समावेश आहे. आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
सब्जा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास होतो, त्यांनी सब्जाचे सेवन केले तर काही दिवसांमध्येच त्यांचा मुळव्याधाचा त्रास दूर होतो. तसेच सब्जा हा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते.
ते शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढवण्याचे काम करतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे हंगाम कोणताही असो सब्जाचे सेवन केलेच पाहिजे. काही लोक फक्त उन्हाळ्यामध्येच सब्जाचे सेवन करतात.
वेळचेवेळी चेहऱ्याला मसाज, क्लिनअप या ट्रिटमेंट करून घ्या
शरीर हायड्रेड ठेवा
धुम्रपानापासून दूर रहा
त्वचा कोरडी होणार नाही याची काळजी घ्या
हवामानानूसार ऊन, पाऊस आणि थंडीत त्वचेचे रक्षण करा (Face Beauty Tips)
व्हिटॅमिन सी हे आपल्या शरिराला आवश्यक असणाऱ्या जीवनसत्त्वांपैकी एक असलेले महत्वाचे व्हिटॅमिन आहे. मानवी शरीर हे व्हिटॅमिन सी तयार करू शकत नाही. त्यामुळे, ते आपल्याला आहारातून मिळवावे लागते.
संशोधन असे सांगते की, व्हिटॅमिन सी हे त्वचेचे संरक्षण करण्यात आणि शरिरात अधिक कोलेजन तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, तुम्ही आहारामध्ये व्हिटॅमिन सी ने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. त्यामध्ये तुम्ही पालक, लिंबूवर्गीय फळे इत्यादींचे सेवन करू शकता. (Vitamins)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.