Collagen Rich Foods esakal
लाइफस्टाइल

Collagen Rich Foods : वाढत्या वयासोबत त्वचा निस्तेज दिसतेय? मग, आहारात 'या' कोलेजनयुक्त पदार्थांचा करा समावेश, त्वचा दिसेल तरूण

Collagen Rich Foods : आपण जसा आहार घेतो तसा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जर आपला आहार संतुलित आणि चांगला असेल तर, याचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर आणि केसांवर ही होतो.

Monika Lonkar –Kumbhar

Collagen Rich Foods : आपण जसा आहार घेतो, तसा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जर आपला आहार संतुलित आणि चांगला असेल तर, याचा परिणाम आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेवर आणि केसांवर ही होतो. यामुळे, आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते. जर आहार व्यवस्थित नसेल, तर आरोग्य बिघडते आणि त्वचा निस्तेज दिसू लागते.

परंतु, आज आम्ही तुम्हाला काही अशा कोलेजनयुक्त पदार्थांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केल्यास वाढत्या वयातही तुमची त्वचा फ्रेश आणि तरूण दिसण्यास मदत होईल. हे कोलेजनयुक्त खाद्यपदार्थ आरोग्यासोबतच आपल्या त्वचेची काळजी घेण्यात मोठी भूमिका बजावतात. चला तर मग जाणून घेऊयात या खाद्यपदार्थांबद्दल.

ब्रोकोली

व्हिटॅमीन सी ने समृद्ध असलेली ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त इतर अनेक पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. वजन कमी करण्यासाठी देखील ब्रोकोलीचा आहारात समावेश केला जातो.

शिवाय, ब्रोकोलीचे सेवन केल्याने शरीरातील कोलेजनची कमतरता दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमच्या वयानुसार चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळायच्या असतील तर, तुम्ही आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता. (Broccoli)

आंबटगोड फळे

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. त्यामुळे, या वातावरणात सिझनल फळे खाण्याला अनेक जण प्राधान्य देताना दिसतात. आपल्या शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यासाठी डॉक्टर लिंबूवर्गीय फळे खाण्याचा सल्ला देतात.

या लिंबूवर्गीय फळांमध्ये लिंबू, अननस, चिंच, बेरी, कैरी इत्यादी फळांचा समावेश होतो. ही फळे तुम्ही आहारात समाविष्ट करू शकता. ही फळे तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानीपासून बचाव करतात आणि कोलेजनचे उत्पादन वाढवतात. त्यामुळे, या आंबटगोड फळांचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करा. (Citrus fruits)

बेरीज

बेरीजमध्ये अनेक प्रकार पहायला मिळतात. स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, गुजबेरी, रास्पबेरी, चेरीज इत्यादी प्रकारच्या बेरीज खायला सगळ्यांनाच आवडते. चवीला आंबटगोड लागणाऱ्या या बेरीज आरोग्यासाठी देखील तितक्याच फायदेशीर आहेत. 

या बेरीजपासून विविध प्रकारच्या स्मूदी, केक्स, ज्यूस बनवले जातात. बेरीजचे सेवन केल्याने शरीरातील कोलेजनची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे, आरोग्यासोबतच त्वचा तरूण दिसण्यासाठी बेरीज फायदेशीर आहे. (Berries)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT