LGBTQ esakal
लाइफस्टाइल

LGBTQ व्यक्तींना भारतात चार गोष्टींचा करावा लागतो सामना

गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल, asexual असल्याचे मान्य करण्यात व्यक्तींना अडथळे येतात.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षण आणि जागरूकता असूनही अनेक ठिकाणी LGBTQ व्यक्तींना चांगले जगता येईल यासाठी प्रयत्न केले जात नाहीत

LGBTQ समुदायासाठी घरच्यांचा पाठिंबा मिळणे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. प्रियजनांचा पाठिंबा असेल तर ते सर्वोत्तम जीवन (Life)जगू शकतात. शिक्षण आणि जागरूकता असूनही अनेक ठिकाणी त्यांना चांगले जगता येईल यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल, asexual असल्याचे मान्य करण्यात व्यक्तींना अडथळे येतात. आपले व्यक्तिमत्व अशा प्रकारचे असल्याचे मान्य करणे काही देशात कठीण जाते. भारतातही LGBTQ लोकांसमोर काही आव्हाने आहेत. (LGBTQ Community Problem)

LGBTQ

ही आहेत आव्हाने (LGBTQ Community Problem)

रॅगिंग करणे (Incessant bullying)

शाळा, कॉलेजमध्ये रॅगिंग केले जाणे हे गृहीत धरले जाते. पण असे रॅगिंग एलजीबीटी कम्युनिटीचेही केले जाते. यामुळे त्यांचे जीवन गुंतागुंतीचे होते. कामाच्या ठिकाणी तर अनेकदा सहकारी लेस्बियन महिलांना बहिष्कृत करतात. समलिंगी पुरुषांना कामाच्या ठिकाणी घाणेरडे विनोद आणि छळाचा सामना करावा लागतो. यामुळे या लोकांना प्रचंड तणावाचा सामना करावा लागतो.

ऑनर किलिंगचा सामना (Clandestine Honour Killings)

काही अहवालानुसार, ग्रामीण भागात जे लोकं LGBT म्हणून बाहेर पडतात त्यांचा छळ केला जातो. समलिंगी व्यक्तीला शिक्षा म्हणून ऑनर किलिंग केले जातात. यामुळे अनेकजण कुटुंबाच्या रागापासून वाचण्यासाठी घरातून पळून जाण्याचा मार्ग निवडतात.

LGBTQ

बलात्काराचाही प्रयत्न (Crimes such as corrective rapes)

काही किशोरवयीन मुलांना पालक आहे तसे मनापासून स्विकारतात. त्यांना समलिंगी अभिमान परेडद्वारे पाठिंबा मिळतो. तर इतरांना त्यांच्या समुदायाचे प्रेम मिळत नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे, काही एलजीबीटी मुली तिच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या बलात्कारासारख्या गुन्ह्यांना बळी पडतात.

कन्व्हर्जन थेरपी सारखी निंदा (Blasphemies Like Conversion Therapy)

लेस्बियन किंवा समलिंगी व्यक्तींवर जबरदस्ती केली जाते. त्यांची धर्मनिंदा केली जाते. तसेच धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केले जाते. हे कार्यक्रम धार्मिक नेत्यांद्वारे आयोजित केले जातात.अशी आव्हाने एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षितता मिळण्यापासून समस्या निर्माण करतात. त्याला कुटूंबासमोर यायलाही त्रास होतो. यावर काहीतरी तोडगा काढला जाणे गरजेचे आहे. (LGBTQ Community Problem)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT