Fridge Care Tips : पावसाळ्याचा सिझन कुणासाठी मजा असतो तर कुणासाठी सजा. पावसाळ्यात येणारे थंड वारा, पाऊस एन्जॉय करणारा एक वेगळाच गट आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात भिजत काम करणारे लोक आहेत.
पावसाळ्यात सगळ्याच गोष्टींची जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात एअर कंडिशनर असो, टेलिव्हिजन असो किंवा रेफ्रिजरेटर, त्यांची योग्य प्रकारे सुरक्षा न केल्यास त्यांचे आयुर्मान कमी होऊ शकते. रेफ्रिजरेटरबद्दल बोलायचं झालं तर, स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टींपैकी एक म्हणून आपण पावसाळ्यात त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. (Monsoon Tips)
पावसाळ्यात आपण सर्वांनी आपल्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची देखील वेळोवेळी काळजी घेणे आवश्यक आहे. (Fridge Care Tips : Do you do such carelessness with the fridge in monsoon? Food will get moldy, do not make these mistakes)
एअर कंडिशनर असो, टेलिव्हिजन असो किंवा रेफ्रिजरेटर, नीट न ठेवल्याने तो लवकरच तुम्हाला दगा देऊ शकतो. रेफ्रिजरेटरबद्दल बोलायचं झालं तर स्वयंपाकघरातील आवश्यक गोष्टींपैकी एक, म्हणून आपण पावसाळ्यात त्याची जास्त काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचा शत्रू सर्वात जास्त ओलावा आणि त्यातून येणारे बॅक्टेरिया असतात. ओलावा जास्त असल्याने फ्रीजमध्ये विचित्र वास येऊ शकतो. याशिवाय जर तुम्ही पावसाळ्यात काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या अन्नावर जंतूंची समस्या निर्माण होऊ शकते.
पावसाळ्यात या त्रासांपासून दूर राहण्यासाठी, तुम्ही तुमच्या रेफ्रिजरेटरच्या दरवाजाच्या सीलमध्ये कोणतेही अंतर किंवा क्रॅक नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. पावसाळ्यात फ्रीजचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका आणि शक्यतो दर 4-6 दिवसांनी फ्रीज तपासत राहा. यामुळे तुम्हाला कळेल की फ्रीजमध्ये घाण, किंवा बुरशी येणार नाही. (Cleaning Tips)
पावसाळ्यात फ्रीज साफ करण्यात तुमची आवड निर्माण झाली पाहिजे, जे विशेषतः महत्वाचे आहे. यासाठी फ्रीजमधील सर्व कपाट, पार्ट बाहेर काढा आणि कोमट पाणी आणि साबण यांचे द्रावण घ्या आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे तुमच्या फ्रीजमधील घाण आणि बॅक्टेरिया साफ होतील. हे तुमच्या खाद्यपदार्थांचे जतन करण्यात मदत करेल आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करेल.
फ्रिजचे अंतर किती असावे
फ्रिज भिंतीपासून ५-६ इंच आणि गॅसपासून ६ फूट लांब ठेवावा किंवा हवेशीर जागेवर ठेवावा. कारण कॉम्प्रेसरमधून येणारी गरम हवा खेळती राहिली नाहीतर पुन्हा येणाऱ्या हवेमुळे उष्णता वाढून त्याचा परिणाम फ्रिजच्या तापमानावर होतो.
फ्रिजची जागा
फ्रिज नेहमी सपाट जागेवर ठेवावा. उंचसखल भागावर तो हलता राहिल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. गरम पदार्थामुळे कॉम्प्रेसरवर दबाव येवून फ्रिजची क्षमता कमी होते व फ्रिजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. (Fridge Care Tips)
फ्रिजबाबत ही सवय लावून घ्या
फ्रिज चालू असताना त्याचा दरवाजा २०-२५ सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये. दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रिजच्या आतील तापमानात वाढ होवून कॉम्प्रेसर थंडावा मिळविण्यासाठी जास्त वेळ घेतो त्यामुळे वीज बीलही वाढते.
फ्रिजची तपासावा
आठवडय़ातून एकदा फ्रिजमध्ये काय शिल्लक आहे हे तपासून पहावे. दुर्लक्ष झाल्याने पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. नको असलेल्या गोष्टी टाकून द्याव्यात. फ्रिजमध्ये भांडी किंवा इतर वस्तू ठेवताना फ्रिजच्या कडांना चिकटून ठेवू नये. सर्व बाजूने हवा खेळती राहिल्यास पदार्थाना व्यवस्थित थंडावा मिळतो. (Kitchen Tips)
फ्रिजचे तापमान
फ्रिजच्या प्रत्येक भागाचे तापमान वेगळे असते. प्रत्येक रॅकचे तापमान लक्षात घेऊन त्याप्रमाणे पदार्थ ठेवल्यास पदार्थ जास्त टिकेल, घाईघाईत पदार्थ काढताना सांडासांड होणार नाही. फ्रिजच्या अगदी तळाच्या भागात थंडावा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी भाज्या, फळे, ठेवावी.
फ्रिजमधील वस्तू
फुले, पालेभाज्या कागदात किंवा कपडय़ात गुंडाळून ठेवाव्या. फ्रिजमध्ये भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा. त्यामुळे ट्रेमधला दमटपणा शोषून जातो. स्पंज न मिळाल्यास टर्किशचा नॅपकीन भाज्यांवर पसरून घालावा म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाहीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.