womens day celebration sakal
लाइफस्टाइल

सहभाग तुझा माझा

मैत्रीणी, महिला दिनाच्या उशिरा; पण हार्दिक शुभेच्छा. अर्थात अजून सेलिब्रेशन सुरू आहेच कुठे ना कुठे. महिला दिन साजरा करताना मला नेहमी हे जाणवतं.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. समिरा गुजर-जोशी

मैत्रीणी, महिला दिनाच्या उशिरा; पण हार्दिक शुभेच्छा. अर्थात अजून सेलिब्रेशन सुरू आहेच कुठे ना कुठे. महिला दिन साजरा करताना मला नेहमी हे जाणवतं, की अशा कार्यक्रमांना प्रामुख्यानं महिलांची उपस्थिती असते. तू म्हणशील, ‘यात काय गैर आहे? आपण बायका एकत्र येऊन आपलं स्त्री असणं साजरं करण्यासाठीचा तो दिवस आहे.’

अगदी बरोबर आहे तुझं; पण असा विचार कर, की ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ मुलं साजरा करतात. म्हणजे ज्या घटकाचा गौरव त्या दिवसाद्वारे करायचा तो घटक आणि ज्यांनी गौरव करायचा तो घटक हे दोन्ही घटक असतात. मला ठाऊक आहे, तू लगेच उदाहरण देशील की अभियंता दिन, डॉक्टर दिन हे बहुधा ते ते घटक एकत्र येऊन साजरे करतात.

हा दिवस महिलांचा, महिलांनी मिळून साजरा करण्याचा....तर तुझा मुद्दा मला मान्य; पण यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय आहे? Inclusion... सहभाग. म्हणून मला असं वाटतं, की महिला दिन हा पुरुषांनी साजरा करायला हवा, तर आपल्या स्त्री म्हणून गौरवाला पूर्णता येईल आणि जो सहभाग आपल्याला एरवीही अपेक्षित आहे तो साधला जाईल.

म्हणजे बघ.. स्त्री - पुरुष समानता असं आपण सर्रास म्हणतो; पण ही संकल्पना किती प्रामाणिक आहे? निसर्गतःच आपण आणि पुरुष वेगळे आहोत, मग त्यात समानता कशी साधणार? आणि मग समानतेसाठी स्त्रीनं पुरुषाची बरोबरी करायची, की पुरुषानं स्त्रीची? म्हणूनच लिंगभावविषयक समानतेपेक्षा ‘लिंगभावविषयक सन्मान’ ही कल्पना मला अधिक भावते. स्त्री- पुरुष दोघांनीही एकमेकांच्या भूमिकांचा सन्मान केला, तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

आणि याची सुरवात करण्याची सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपलं कुटुंब आहे, नाही का? म्हणजे बघ, जन्म देण्याची जबाबदारी नैसर्गिकरीत्या स्त्रीवर असली, तरी तिचं मातृत्व तिच्यासाठी आणि बाळासाठी सुखद करण्याच्या जबाबदारीत सगळे सहभागी झाले तर तो सहभाग. स्त्रीला एखादी तिच्या प्रगतीसाठी आवश्यक संधी मिळावी यासाठी इतरांचं पुढे येणं हा सहभाग.

माझ्या एका मैत्रीणीचा किस्सा सांगते. तिनं बाळाच्या जन्मासाठी रजा घेतली होती. सहा महिन्यांच्या सुट्टीनंतर ती अतिशय उत्साहानं पुन्हा कामावर रुजू झाली. तिच्या टीमनंही तिचं उत्साहानं स्वागत केलं आणि आल्याआल्या एक निर्णय सांगितला, की पुढील एक वर्ष तुला कुठल्याच महत्त्वाच्या प्रोजेक्टवर नियुक्त करणार नाही.

अर्थात त्यांचा हेतू चांगला होता; पण तिचा मूड गेला. कारण आपल्या कामाच्या आड आपलं मातृत्व येऊ नये यासाठी तिनंही खूप मेहनत घेतली होती. बाळासाठी सपोर्ट सिस्टिम तयार करण्यापासून अनेक गोष्टी तिनं केल्या होत्या, कारण तिला कामातही स्वतःला सिद्ध करायचं होतं. तिचं म्हणणं एवढंच होतं, की मला नेमकी काय मदत हवी आहे हे मला विचारायचं तरी होतं! तिच्या दृष्टीने तिच्या करिअरचं एक वर्ष वाया गेलं.

या घटनेबाबत उलटसुलट चर्चा करता येईल; पण मला वाटतं, सहभागाचा एक आवश्यक घटक आहे, विचारणं, संमती घेणं. आपल्या कुटुंबातही अनेकदा निर्णय ‘सांगितले’ जातात, विचार करून एकत्र ‘घेतले’ जात नाहीत. हे सारं मुद्दाम, दुष्टपणानं केलं जातं असंही नाही. एकमेकांशी अनेक विषयांवर मोकळेपणानं बोलणं न होणं हा मुख्य अडसर असतो. अनेकदा पुरुषांना बाईच्या समस्येची पुरेशी जाणीव नसते.

आपल्या या सदरातच मी हार्मोनल चेंजेसबद्दल लिहिलं होतं, तेव्हा सदर वाचणाऱ्या अनेक पुरुषांनी मला याविषयी फार माहिती नसल्याचं प्रामाणिकपणे कळवलं. म्हणूनच मला असं वाटतं, की महिला दिनाच्या कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग हवा. अगं, ‘बाईपण भारी देवा’सारखा सिनेमा बघूनही पुरुष ‘अरे, याचा कधी विचार केला नव्हता,’ असं म्हणतात. थोडक्यात, परस्परसंवाद घडायला हवा.

यंदाच्या थीममध्ये आणखी एक संकल्पना आहे - इन्व्हेस्ट इन विमेन - प्रगतीची गती वाढवण्यासाठी महिलांमध्ये ‘गुंतवणूक’ करा. महिलांमध्ये गुंतवणूक करा म्हणजे काय? फक्त तिच्या लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी पैसा उभा करा, असं नाही. ही गुंतवणूक जशी पैशाची असू शकते तितकीच वेळेची, श्रमाची असू शकते. मघाचं मातृत्वाचं उदाहरण परत घेतलं, तर बाबानं किंवा कुटुंबातल्या कोणीही बाळासाठी वेळ काढणं हे आईत वेळ ‘इन्व्हेस्ट’ करणं आहे.

घरातल्या कामाच्या नियोजनात सहभाग घेणं हे श्रम इन्व्हेस्ट करणं आहे. तिच्या आरोग्याची, आहाराची काळजी घेणं हेही तिच्यासाठी गुंतवणूक करणं आहे. अशी गुंतवणूक कुटुंबासाठी नेहमीच फायदेशीर ठरणार यात शंका नाही. उलट मला तर वाटतं, ही इन्व्हेस्टमेंट करताना स्त्री-पुरुष या कारणास्तव करू नये, कुटुंब म्हणून करावी. फुटबॉलच्या खेळात कसं, बॉल एका प्लेअरकडे असतो; पण संघातील बाकीचे लोक त्याला कव्हर करत असतात; त्याप्रमाणे संसारात जेव्हा ज्याच्याकडे बॉल असेल, तेव्हा इतर टीम मेंबरनी त्याला सपोर्ट करावा.

मग कधी बॉल पतीकडे असेल, कधी पत्नीकडे, कधी मुलाकडे, कधी मुलीकडे. ही भावना कुटुंबात रूजली, की मग समाजही हळूहळू अधिक विश्वासानं स्त्रीमध्ये ‘गुंतवणूक’ करायला तयार होईल- मग ती स्त्री उद्योजिका असो, संशोधक असो, लेखिका, नेता वा अन्य काही. तुला काय वाटतं या गुंतवणुकीविषयी, तुझ्या कल्पना ऐकायला मी उत्सुक आहे. नक्की कळव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT