Friendship Day Decoration Idea: दरवर्षीप्रमाणे यंदा ४ जुलैला म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जाणार आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी एकमेकांना गिफ्ट देतात. तसेच मैत्री दिनानिमित्त मित्राला खास वाटण्यासाठी घराची किंवा रूमची सजावट करतात. पण सजावट करण्यासाठी कमी वेळे असेल तर पुढील पर्याय वापरून झटपट घराची सजावट करू शकता.
मैत्रीदिनानिमित्त मित्राला खास वाटण्यासाठी रूम किंवा घराची बलून वापरून सजावट करू शकता. यासाठी विविध आकारातील बलूनचा वापर करू शकता. ही सजावट पाहून तुमचा मित्र खुप आनंदी होईल. आजकाल बाजारात विविध आकाराचे आणि रंगाचे बलून मिळतात.
रूममध्ये फोटो फ्रेम लावू शकता. यामुळे घराची आणि रूमची शोभा वाढेल. तुमचे मित्रासोबतच असलेले सुंदर फोटो घेऊन त्या फ्रेममध्ये लावू शकता. बाजारात अनेक सुंदर डिझाइन असलेले फोटो फ्रेम मिळतात.
मैत्री दिनाला खास बनवण्यासाठी घरात फेरी लाइटिंगने सजावट करू शकता. तुम्ही ही लाइटिंग खिडकी किंवा दारावर लावू शकता. यामुळे घराला सुंदर लूक मिळेल. तसेच ही सजावट पाहून तुमचा मित्र देखील आनंदी होईल.
आजकाल वॉल आर्टचा टेंड जास्त आहे. अनेक लोक घराच्या सजावटीसाठी वॉल आर्ट लावतात. पण तुम्ही मैत्रीदिनानिमित्त देखील सुंदर वॉल आर्ट लावून भिंतीवर सजावट करू शकता. कमी वेळेत सजावट करून मित्राला सुंदर सरप्राइज देऊ शकता.
वॉल हॅगिंग देखील घर सजावटीसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही मैत्रीदिनानिमित्त खास असे वॉल हॅगिंग वापरू शकता. तसेच वॉल हॅगिंगजवळ फोटोशुट देखील करू शकता.
रंगीत पेपरचा वापर करून पेपर फॅन बनवू शकता. यामुळे घराला सुंदर आणि हटके लूक मिळेल. तुम्ही मैत्रीदिनानिमित्त रंगीत पेपर फॅन बनवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.