Friendship Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2024: दोन दोस्तांची कमाल! दोन हजारांत उभारली 25 कोटींची कंपनी, अन् मुलांना अभ्यासाला लावलं

सकाळ डिजिटल टीम

Friendship Day 2024 :

तुझ्या त्या मित्रासोबत फिरू नकोस, त्याच्यासोबत फिरलास तर तुझ्या करिअरचे सुद्धा नुकसान होईल, असा सल्ला पालकांनी आणि चांगला मित्रांनी तुम्हाला अनेक वेळा दिला असेल. पण तरीही तुम्ही त्यांच्याशी असलेली मैत्री तोडली नसेल. कारण तुम्ही पक्के मित्र आहात.

सगळेच मित्र असे नसतात. काही मित्र स्वतःही पुढे जातात आणि तुम्हालाही पुढे घेऊन जातात. आज मैत्री दिन आहे म्हणजेच फ्रेंडशिप डे आहे. त्यानिमित्ताने आपण अशा दोन मित्रांची गोष्ट जाणून घेणार आहोत. ज्यांनी जीवनात काहीतरी करून दाखवलं. आणि ते किती चांगले मित्र आहेत हेही सिद्ध केले.

हे दोन मित्र मध्य प्रदेश मधील देवास या जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांची नावं अथर्व आणि प्रणय अशी आहेत. या दोन मित्रांनी 2000 पासून सुरुवात करून दोन कोटींची कंपनी उभारले आहे. आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.

तुम्ही शोले चित्रपटातील मधले जय आणि वीरू पाहिले असतील जे एकमेकांचे साथ सोडत नाहीत. जे काही काम करतात ते एकत्र करतात, शिक्षा सुद्धा एकत्र भोगतात. अगदी तसंच मित्र सुद्धा एकत्र यशस्वी झालेत. या दोघांपैकी एकही मित्र श्रीमंत नव्हता. हे दोघेही सामान्य कुटुंबातील होते. विशेष गोष्ट म्हणजे अथर्व आणि प्रणय हे दोघेही अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत.

शाळेत शिकत असताना आपल्याला अभ्यास करण्यासाठी जोर दिला जातो. मुलांनी अभ्यास करावयासाठी त्यांना शिक्षाही केली जाते. तर शाळेतील शिकवलेली प्रत्येक गोष्ट समजणं अवघड असतं. त्यामुळे ते पटकन लक्षात येणं आणि अभ्यास करणे याचा मुलांमध्ये गोंधळ होतो.

मुलांचे ही समस्या लक्षात घेऊन या दोन मित्रांनी एक असा प्लॅटफॉर्म उभा केला आहे जो मुलांना अभ्यासात मदत करू शकणार आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अथर्व आणि प्रणय यांनी ग्रॅज्युएशनसाठी वेगवेगळ्या शहरांची निवड केली. हे दोघेही लहानपणापासून मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे यावर चर्चा करायचे.

शालेय अभ्यासादरम्यान दोघांनीही ठरवले होते की, भविष्यात आपण अभ्यास सुटसुटीत व्हावा यासाठी नक्कीच काहीतरी करू. जेव्हा ही आयडिया प्रत्यक्षात आणली गेली तेव्हा दोघांनी मिळून प्रत्येकी 1,000 रुपये गुंतवले आणि 'पढले' नावाची वेबसाइट तयार केली. त्यांनी वेबसाइटवर इयत्ता 9 वी आणि 10वीसाठी स्वतःच्या लिखित नोट्स पोस्ट करण्यास सुरुवात केली.

विद्यार्थ्यांना त्याच्या नोट्स आणि लेक्चर्स आवडल्या आणि त्याचे युजर्स वाढत गेले. त्यामुळे दोन्ही मित्रांना खूप प्रोत्साहन मिळाले. 2021 मध्ये त्यांनी ‘पढले’ नावाचे ॲपही लाँच केले. यानंतर त्यांनी इयत्ता 9वी आणि 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिला. या कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज, नोट्ससह NCERT चे संपूर्ण उपाय आणि बरेच काही आहे.

या App वर अभ्यासक्रम सोप्या आणि मनोरंजक भाषेत देण्यात आला आहे. याशिवाय मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून अभ्यास अधिक मनोरंजक बनवण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. अथर्व आणि प्रणय यांनी बहुतांश विषयांचे अभ्यासक्रम स्वतः तयार केले आहेत. तर काही विषयांसाठी त्यांनी इतर शिक्षकांची मदत घेतली आहे.

मुलांना शिक्षक म्हणून नव्हे तर मित्र म्हणून शिकवले तर ते चांगले समजतात, असे अथर्व सांगतात. तसेच, शिकवण्याची पद्धत अशी असावी की, मुलांना ते ओझे वाटू नये, उलट मुलांनी आनंद घेत शिकावे, असे त्यांचे मत आहे. त्यांना शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणायचे आहेत. आणि त्यांच्या या मोहिमेला फळ मिळताना दिसत आहे.

सध्या लाखो मुले त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अभ्यासक्रमांचा लाभ घेत आहेत आणि गोष्टी शिकत आहेत. 2000 च्या गुंतवणुकीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्लॅटफॉर्मचे मूल्य आज सुमारे 25 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

यावर्षी पहिल्या तिमाहीत 1 कोटींहून अधिक महसूल मिळवला आहे. आता या दोघांनी 11वी आणि 12वीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार केला आहे. खरंच या दोन मित्रांनी मुलांना अभ्यासाला लावलं असंच म्हणावं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवाब मलिक यांच्या जावयाच्या निधनाचे वृत्त अफवा! महत्त्वाची अपडेट समोर...

Bishnoi Gang-Baba Siddique: "सलमान-दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनो..." बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी अखेर बिश्नोई टोळीने स्वीकारली

"सिनेमाची स्वतःचं तिकीट खरेदी करून खोटं कलेक्शन जाहीर केलं" , दिव्या खोसलाने केला आलियावर आरोप

Assembly Election 2024: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उलथापालथ! काँग्रेमधून महिला आमदाराची हकालपट्टी, अजित पवार गटात करणार प्रवेश!

State Funeral For Baba Siddique: बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

SCROLL FOR NEXT