Friendship Day 2024 Sakal
लाइफस्टाइल

Friendship Day 2024: 'या' भेटवस्तू तुमच्या मित्रांना ठेवतील दिर्घकाळ निरोगी अन् तंदुरूस्त

Friendship Day Gift Idea: मैत्रीदिनानिमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणीला खास भेटवस्तू देऊन निरोगी आणि तंदुरूस्त ठेऊ शकता.

पुजा बोनकिले

Gift Idea For Friendship Day 2024: मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असं नातं असतं. दरवर्षी ४ जुलैला म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक आपल्या प्रिय मित्र-मैत्रीणीला भेटवस्तू देतात. सध्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तुमचे मित्र-मैत्रीण नोकरी करत असेल आणि त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर यंदा मित्र-मैत्रीला आरोग्यदायी भेटवस्तू देऊन मैत्री दिवस खास बनवू शकता.

मिक्स सीड्स जार

मैत्री दिनानिमित्त मिक्स सीड्सचा जार भेटवस्तू म्हणून देऊ शकता. यामध्ये जवळ, भोपल्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया मीठ लावून भाजलेल्या असतात. या मिश्रित बीयांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहते. या बीयांमध्ये प्रोटिन पुरेशी प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

एवढेच नाही तर या बीयांचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. या बीयांमध्ये जीवनसत्वे असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच त्वचा आणि हाडांचे आरोग्य निरोगी राहते.

मासिक पाळीचे कप आणि टॅम्पन्स

तुमच्या मैत्रीणीने अद्याप मासिक पाळीचा कप किंवा टॅम्पन वापरले नसेल तर या मैत्री दिनानिमित्त भेट देऊ शकता. हाताने बनवलेल्या ग्रीटिंग कार्डवर छान संदेश लिहून मासिक पाळीचा कप किंवा टॅम्पन वापरायला सांगू शकता. पॅडच्या तुलनेत त्याचा वापर अधिक आरामदायी आहे. यामुळे संसर्गाचा धोका देखील राहत नाही.

योगा मॅट

यंदा मैत्री दिनानिमित्त योगा मॅट भेटवस्तू देऊ शकता. हा एक उत्तम पर्याय आहे. योगा मॅटमुळे योगा करणे सोपे होते. योगा केल्याने शरीर निरोगी आणि तंदुरूस्त राहते. सकाळी नियमितपणे प्राणायम, कपालभाती यासारखे योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते.

Gift Idea

होममेड स्किन केअर

यंदा मैत्री दिनानिमित्त होममेड स्किन केअर प्रोडक्ट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुमच्या मित्र -मैत्रीणीच्या चेहऱ्यावर मुरूम असेल तर हे उत्तम भेट असेल. यासाठी तुम्ही काकडी, ग्रीन टी, तांदळाचे पाणी वापरून घरच्या घरी स्किन टोनर तयार करून एका सुंदर बॉटलमध्ये भरून भेट देऊ शकता. तसेच पेडीक्योर आणि मॅनीक्योर किट देखील भेटवस्तू देऊन हा दिवस खास बनवू शकता.

सुकामेवा गिफ्ट बॉक्स

सुकामेव्यामध्ये प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शिअम यासारके पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सुकामेव्यांमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करते. सुकामेव्यामध्ये काजु, बदाम, अंजीर, अक्रोड यांचा समावेश होतो. तसेच हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. मैत्री दिनानिमित्त हे सुकामेवा गिफ्ट बॉक्स भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT