friendship relation bond of manava naik and mugdha godbole Sakal
लाइफस्टाइल

मनमोकळी मैत्री

वेळोवेळी मला तिनं काम करत असताना अनेक गोष्टी शिकवल्याही आहेत. वैयक्तिक आयुष्यात आपण मनातल्या गोष्टी आईसोबत किंवा बहिणींसोबत शेअर करत असतो

सकाळ वृत्तसेवा

- मनवा नाईक |मुग्धा गोडबोले

एकाच क्षेत्रात काम करत असताना, जिथं आपली इतर लोकांशी स्पर्धा असते, तिथं जेव्हा त्यामधील एखाद्या व्यक्तीशी आपली घट्ट मैत्री होते ना ते नातं खूप भारी असतं. असंच काहीसं झालं अभिनेत्री मनवा नाईक आणि मुग्धा गोडबोले यांच्यासोबत. एका नाटकादरम्यान मनवा आणि मुग्धाची खऱ्या अर्थानं एकमेकींसोबत मैत्री झाली आणि तेव्हापासून त्या दोघीही एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत.

याविषयी मनवा म्हणाली, ‘‘मुग्धाला मी सुरुवातीपासूनच ओळखत होते; पण तिला जवळून पाहण्याची संधी मला ‘हॅम्लेट’ नाटकामुळे मिळाली. या नाटकात आम्ही दोघींनीही काम केलं आहे. त्या आधीसुद्धा आम्ही ‘आभाळमाया’ या मालिकेत काम केलं होतं; परंतु त्यावेळी माझं काम संपल्यावर मुग्धा त्या मालिकेचा भाग बनली होती.

त्यामुळे खऱ्या अर्थानं आमची ओळख झाली ती ‘हॅम्लेट’दरम्यानच. या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आणि यामुळे आम्ही खूप वेळ सोबत घालवला. या दरम्यानच आमची मैत्री झाली आणि आता मुग्धा माझी बेस्ट फ्रेंड आहे.

वेळोवेळी मला तिनं काम करत असताना अनेक गोष्टी शिकवल्याही आहेत. वैयक्तिक आयुष्यात आपण मनातल्या गोष्टी आईसोबत किंवा बहिणींसोबत शेअर करत असतो, तसंच माझ्या प्रोफेशनल आयुष्यात मन मोकळं करण्यासाठी मुग्धा नेहमीच असते. मी तिच्यापाशी विश्वासानं सगळ्या गोष्टी शेअर करते.’’

मुग्धा म्हणाली, ‘‘आम्ही दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झालोत, याचं कारण मला वाटतं, की आम्ही दोघीही हुशार व्यक्ती आहोत. सोबतच आम्ही दोघीही हे जाणून आहोत, की समोरची व्यक्ती आपल्याला कितीही जवळची असली, तरी एक बाऊंड्री असते आणि काहीही झालं तरी ती क्रॉस करायची नसते. जगात काहीही झालं, तरी आम्ही गरजेपेक्षा जास्त एकमेकींना वैयक्तिक प्रश्न नाही विचारत. तेवढी स्पेस देतो आम्ही.

कधी क्वचित आमच्यापैकी एकीला काही सांगायचं असेल, तर ती हक्कानं मन मोकळं करते आणि त्यावेळी समोरची व्यक्ती ते शांतपणे ऐकून घेते. मला विचाराल, तर माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे, की मनवा तिच्या आयुष्यात खूष आहे, सेफ आहे;

पण त्यापलीकडे जर तिला माझी गरज असेल, तर मी तिच्यासाठी कायम ॲव्हेलेबल आहे. आमच्यात असं नाहीये, की आम्ही रोज प्रत्येक मिनिटामिनिटांचे अपडेट्स एकमेकींना देतो. दिवसभरातून आमचा एकच मोठा लांबलचक कॉल होतो, जो खूप सुंदर असतो.’’

मनवा सांगत होती, ‘‘मुग्धा कायम सकारात्मक आणि हसतमुख असते. ती नेहमीच ॲक्टिव्ह असते. ‘हॅम्लेट’दरम्यान आम्ही खूप मस्ती केली. आम्हा १८ कलाकारांच्या टीममध्ये फक्त आम्ही दोघीच मुली होतो. त्यात आम्ही एवढा दंगा करायचो, की सुमीत राघवन म्हणायचा, ‘आपल्यासोबत मुली नाहीच आहेत.

या दोघीही मुलंच आहेत.’ मी तिला कधीही म्हटलं, की चल फिरायला जाऊ, तर ती नेहमी तयार असते. ती कधीच ‘नाही गं, आता नको, मला झोप आलीये,’ अशी कारणं नाही देत. तिच्यासोबत असताना नेहमी भारी वाटतं. ती उत्कृष्ट अभिनेत्रीबरोबरच एक उत्तम लेखिकाही आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, की तिनं लवकरच एक संपूर्ण सिनेमाचं लेखन करावं आणि ती हे एक दिवस नक्की करेल.’’

शेवटी मुग्धा म्हणाली, ‘‘आता आम्ही एकत्र काम करतो. तिच्या प्रॉडक्शनमध्ये मी लिखणाचं काम करते, सोबतच अभिनयही करते. त्यामुळे पुन्हा एकदा जवळून तिच्यासोबत काम करता येतंय मला. ती ज्या प्रकारे मालिकांचं प्रॉडक्शन बघते, ते खरंच कौतुकास्पद आहे आणि ही अजिबातच सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे माझ्या मनात तिच्याविषयी खूप आदर आहे.

मला एक व्यक्ती म्हणून ती खूप जास्त आवडते. अजून एक गोष्ट म्हणजे, तिला तिच्या क्षमतेपेक्षा जास्त त्रास जरी झाला, तरी तो तिच्या चेहऱ्यावर कधीच नाही दिसत. ज्या गोष्टी तिला पटत नाहीत किंवा तिला त्रास देतात अशा गोष्टी ती धरून ठेवत नाही. ती लगेच ‘मूव्ह ऑन’ होते आणि ही खूप चांगली बाब आहे.’’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT