आश्चर्यच! वधूनं अवघ्या 50 हजारांत उरकलं लग्न esakal
लाइफस्टाइल

आश्चर्यच! वधूनं अवघ्या 50 हजारात उरकलं लग्न

पाहुण्यांसाठी स्वत:चं बनवलं जेवण

सकाऴ वृत्तसेवा

लग्नाला जीवनाचा सर्वात खर्चिक कार्यक्रम बनवणाऱ्यांसाठी एक वेगळे उदाहरण या वधूने समोर ठेवले आहे. स्टॅसी (Staci)नावाच्या या वधूने तिचे लग्न फक्त 50 हजार रुपयांमध्ये केले. वधूने स्वतःसाठी महागडे कपडे घेतले नाहीत, किंवा डेकोरेशनसाठी खूप पैसा खर्च केला नाही. तिने केटरिंग सर्व्हिस ऐवजी पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम स्वतःच्या हाताने केले आहे.

इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्समध्ये राहणारे कपल्स स्टॅसी आणि ग्रँट चॅपमन यांनी एका अर्थसंकल्प समारंभात (बजट सेरेमनी) लग्न केले. या कपल्सने त्यांच्या लग्नात एकूण 54 हजार रुपये खर्च केले. यापैकी त्यांनी त्याच्या वेडिंग ड्रेसवर फक्त 5700 रुपये खर्च केले. या कपल्सने त्यांच्या लग्नावर जेवढा खर्च केला त्यापेक्षा जास्त त्यांना पाहुण्यांकडून भेटवस्तूंमधून मिळाले. ज्या बजेटमध्ये 31 वर्षीय स्टेसीने 37 वर्षीय ग्रँट चॅपमॅनसोबत तिच्या लग्नाचे प्लॅन केले ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. या लग्नात मित्र आणि नातेवाईकांसह एकूण 30 लोक उपस्थित होते.

कपल्सने 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर, स्थानिक रजिस्टर ऑफीसमध्ये लग्न केले आणि नंतर त्यांच्या नवीन घरी साधे रिसेप्शन केले. DIY आयडियाचा वापर करून, या कपल्सने संपूर्ण लग्न फक्त 54 हजार रुपयांमध्ये केले, तर त्यांना 80 हजार रुपये लग्नाचे गिफ्ट म्हणून मिळाले. तीन मुलांची आई स्टेसी म्हणते की, लग्नाच्या नोंदणीसाठी तिला 16 हजारचा खर्च आला. हे अगदी चर्चसारखे दिसते आणि फोटोग्राफीसाठी देखील हे एक परफेक्ट ठिकाण आहे. या एका छोट्या लग्नात, कपल्सने पैसे वाचवले आहेत, जे की केवळ काहीजण दिखाव्यावर खर्च करतात.

लग्न सोहळा संपल्यानंतर या कपल्सने लोकांना त्यांच्या घरी रिसेप्शनसाठी बोलावले. त्या लोकांनी स्टेसीच्या हाताने बनवलेले अन्न खाल्ले. तीने सकाळीच स्वंयपाक बनवून लग्नासाठी हजर होती. त्यांचा एक मित्र बेकर आहे, म्हणून त्याला गिफ्ट म्हणून वेडिंग केक मिळाला. या कपल्सच्या कुटुंबातील सदस्यांनी एका प्रोफेशनल फोटोग्राफरची नेमणूक केली होती, जेणेकरून लग्न संस्मरणीय बनू शकेल. त्याने ब्रायडल पार्टीचे गिफ्ट आणि फेवर्सवर पैसे खर्च केले नाहीत. त्यांच म्हणणं आहे की, लग्न हा आनंदाचा दिवस आहे आणि तो तणावपूर्ण बनवू इच्छित नव्हता.

स्टेसीने तिच्या स्वत: च्या हातांनी बुके बनवले होते आणि सेकंड हँड डेकोरेशन विकत घेतल्यानंतर सर्व सजावट फक्त 1000 रुपयांमध्ये केली. तिने प्रोमोकोड वापरून स्वस्त वेडिंग ड्रेस खरेदी केला. तिने मेकअप आणि दागिने भाड्याने घेतले होते. वरा चा ड्रेस डिस्काउंटमध्ये घेण्यात आला. ग्रँटने आपल्या वडिलांच्या लग्नाची अंगठी त्यांची वेडिंग रिंग म्हणून वापरली, तर स्टेसीला नवीन एंगेजमेंट रिंग आणि वेडिंग बँड मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT