Gaming Addiction Effects esakal
लाइफस्टाइल

Gaming Addiction Effects : मोबाईल गेमच्या नादानं मेंदू होईल बाद; तुमचं Social आयुष्यही संपेल!

मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांनी ही बातमी वाचलीच पाहिजे!

Pooja Karande-Kadam

Gaming Addiction Effects : काही दिवस आधीपर्यंत नैराश्यग्रस्त लोकांच आयुष्य हे केवळ त्यांची रूम, घर असायचं. पण ट्रेंड बदलेल तसं नैराश्यग्रस्त लोकांच्या सवयीही बदलल्या आहेत. सध्या लोक नैराश्यग्रस्त झाले की, मोबाईल वेडे होतात. सतत मोबाईल हातात घेऊन लोकांचा जगण्याबद्दलचा दृष्टिकोण नकारात्मक बनतो.       

सतत मोबाईल घेणाऱ्याला लोक ओरडतात, मोबाईल जास्त पाहू नको, वेड लागेल असे म्हणतात. लोकांचं हे म्हणणं खरं ठरतं आहे.  दिवसभर गेम खेळत बसलेले लोक एकलकोंडे होत आहेत. असं संशोधनातूनच समोर आलं आहे. (Gaming Addiction Effects : Gaming addiction is very dangerous, your social life can be ruined Take care of these 5 things)

जे लोक जास्तीत जास्त वेळ गेम खेळतात. अगदी एक मिनिट सुद्धा फोन बाजूला ठेवत नाहीत. त्या लोकांसाठीच ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्या लोकांना मोबाईल किती घातकी ठरू शकतो याची लोकांना कल्पना नाही. (Side Effects)

अस्थिनोपिया होतो

सर्वात मोठी हानीकारक गोष्ट म्हणजे सतत फोनवर असण्याचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतो. तुम्ही वेळोवेळी फोनवरून ब्रेक घ्यावा. जर तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन दिवसभर कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहावे लागत असेल, तर तुम्हाला त्यातूनही ब्रेक घ्यावा लागेल. (Mobile)

दिवसभर फोनला चिकटून राहिल्याने, गेमिंगमुळे तुमचे डोळे थकतात. त्याला अस्थिनोपिया असेही म्हणतात. या प्रकरणात, तुम्हाला तुमचा स्क्रीन प्रकार कमी करावा लागेल. तसेच तुम्ही अँटी-ग्लेअर चष्मा वापरू शकता.

व्यसन लागते

तुम्ही बराच काळ कोणताही एक खेळ खेळत असाल तर तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते. तुम्हाला गेम खेळायला आवडेल पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे हे तुम्ही ऐकले असेलच. त्यामुळे गेमिंगची सवय सोडून काही चांगल्या गोष्टींकडे लक्ष्य द्यावे.

फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो

तुम्ही App Store वरून डाउनलोड करता त्या ऑनलाइन गेममध्ये सर्वात मोठा धोका हा आहे की त्यामध्ये व्हायरस असू शकतात. वापरकर्त्याला गेम बनावट आहे की खरा याची कल्पना नाही. अशा परिस्थितीत, आम्हाला फक्त अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवरून गेम डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो.

येथून गेम Download करण्यापूर्वी, आपण त्याचे नियम वाचले पाहिजे. नियम चांगली असतील तरच ते डाउनलोड करा. जर तुम्ही असे केले नाही तर प्रत्येक गेम डाउनलोड करण्याची तुमची सवय तुम्हाला धोक्यात आणू शकते.

नैराश्य

जर तुम्ही फोन सतत वापरत असाल तर तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. गेमिंग दरम्यान, लोक तासनतास एकाच स्थितीत बसतात. यामुळे त्यांचे वजन वाढू शकते. वजन वाढल्याने शरीर अनेक आजारांच घर बनू शकतं. तर, मानसिकदृष्ट्याही ही गोष्ट हानिकारक ठरू शकते.

लोकांपासून दुरावा

सतत मोबाईल घेऊन बसणे ही सवय तुमच्या सामाजिक जीवनावरही परिणाम करू शकते. कारण खेळाच्या व्यसनामुळे आपण आपल्या प्रियजनांना वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमची गेमिंगची सवय कमी करावी लागेल. (Mental Health)

एकलकोंडेपणा वाढेल

गेम खेळल्यामुळे तुमची मुलेही गेमच्या आहारी जातील. घरातील कोणीही तुमच्याशी संपर्क ठेवणार नाही. हा काय सतत मोबाईलवर असतो, त्यामुळे तुम्हाला घरातील समारंभात सहभागी करून घेतले जाणार नाही. किंवा पिकनिकमध्येही तुम्हाला जम्यात धरले जाणार नाही.

चिडचिड वाढेल

गेम खेळण्याच्या नादात तुमचा स्वभाव चिडचिडा बनेल. मन लावून गेम खेळत असताना तुम्ही हरलात तर तुमची चिडचिड होईल. गेममध्ये पराभव झाल्याचा राग तुम्ही घरातील लहान मुलं, सदस्यांवर काढाल. त्यामुळे तुमचा स्वभावही जास्त रागीट बनेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT