gardening is hobby care plant tree environment Sakal
लाइफस्टाइल

‘बागों’ में बहार है!

अभिनयाबरोबरच मला बरेच छंद आहेत. माझं जगणंच छंदोमयी आहे. मी कायम वेगवेगळे छंद जोपासत आले आहे. स्वयंपाक करणं, घर स्वच्छ ठेवणं, रांगोळी काढणं मला आवडतं. माझा आणखी एक आवडता छंद म्हणजे बागकाम.

सकाळ वृत्तसेवा

- सोनाली कुलकर्णी

अभिनयाबरोबरच मला बरेच छंद आहेत. माझं जगणंच छंदोमयी आहे. मी कायम वेगवेगळे छंद जोपासत आले आहे. स्वयंपाक करणं, घर स्वच्छ ठेवणं, रांगोळी काढणं मला आवडतं. माझा आणखी एक आवडता छंद म्हणजे बागकाम.

मला रोपांची निगा राखायला फार आवडतं. घरी ते मी आवडीनं करतेच; पण बाहेर कुठेही गेले, तरी मला रोपांना प्रेमानं पाहतच राहावंसं वाटतं. ती एक वेगळाच आनंद देतात. माझा हा रोपांचा परिवार एवढा वाढत चालला आहे की, कधी-कधी वाटतं माझा नवरा नचिकेत मला रागवतो की काय!

रोपांची काळजी घेण्यात मला एक वेगळाच आनंद मिळतो. आपण आपल्याशी न बोलणाऱ्या रोपांची काळजी घेऊ शकत असू, त्यात जर आनंद मिळत असेल, तर आपण आपल्याशी बोलणाऱ्या माणसांचीही काळजी उत्तमरीतीनं घेऊ शकतो.

मला लहानपणापासूनच आई-बाबांमुळे बागकामाची आवड निर्माण झाली. माझ्या आईचा हात ‘हिरवा’ आहे, म्हणजे ज्याला आपण ‘ग्रीन फिंगर्स’ म्हणतो. ती जे पेरते, ते उगवतं म्हणजे उगवतंच. तिनं प्राजक्ताची डहाळी जरी लावली, तरी ती उगवते.

माझ्या आईनं दिलेलं कमळ माझ्या घरी खूपच सुंदर फुललं आहे. कमळच नव्हे, तर तिनं दिलेली कितीतरी रोपं माझ्याकडे उत्तमरीतीनं फुलली आहेत. तिनं मुंबईहून नेलेलं कडुलिंबाचं रोपही खूप सुंदर उगवलं आहे.

माझ्या बाबांनाही बाग स्वच्छ ठेवायची फार आवड होती. त्यांनी आमच्या पुण्याच्या घरी असंख्य झाडे लावली होती, ज्याच्यामध्ये पेरू, सीताफळ, सोनटक्का, नारळ, जास्वंद, लाल पानं असलेलं राजाराणीचं रोप, मोगरा, तगर, प्राजक्त आणि जाई -जुईचे वेल तर खूपच सुंदर होते. माझी आई घरी येणाऱ्या प्रत्येकाला जुईचे गजरे करून देत असे. आईसाठी जुईच्या कळ्या खुडून घेऊन यायला मलाही फार आवडायचं.

माझी मुलगी कावेरीही माझ्या छंदात सहभागी होते. तिलाही विविध प्रयोग करून बघायला खूप आवडतं. आईनं कावेरीला चिंचोके भेट दिले होते. मी गंमत म्हणून तिला ते पेरायला शिकवले. त्यातून चिंचांची दोन रोपं चांगली वाढली.

मग आम्ही ती आमच्या सोसायटीच्या आवारात उत्तम प्रकारे रुजवली. रोप कावेरीच्या उंचीचं झाल्यावर आम्ही वसुंधरा दिवसाचं औचित्य साधून आमच्या बागेच्या आवारात त्यांचं पुनर्रोपण केलं. आता ते कावेरीच्याच नव्हे, तर माझ्याही उंचीपेक्षा उंच झालेलं आहे. असंच आम्ही गुंजांचं एक झाड सोसायटीला दिलं होतं.

सध्या माझ्याकडे ३०-३५ कुंड्या आहेत. साधी-साधीच रोपं आहेत. मला साध्या देशी रोपांबद्दल विशेष प्रेम आहे. माझ्याकडे गोकर्णीचा वेल नव्हता. योगायोगानं मला चित्रीकरणाच्या सेटवर गोकर्णीची वाळलेली शेंग मिळाली. ती मी काळजीपूर्वक आमच्या बागेत रुजवली आणि आता आमच्याकडे गोकर्णीची सुंदर वेल आली आहे.

माझ्याकडे जवळजवळ दीड वर्ष कर्दळीचं रोपं होतं. ते सुकतही नव्हतं आणि उमलतही नव्हतं, तरीही मी हलकंसं पाणी घालत होते. मी जेव्हा कोकणच्या चित्रीकरणावरून परत आले; तेव्हा त्या कर्दळीला सुंदर केशरी रंगाची फुले आलेली होती. त्यामुळे मला फार आनंद झाला.

आमच्याकडे मनीप्लांट आहे. कॅक्टसचे भरपूर प्रकारही आहेत. शाळेत असल्यापासून मी १०० प्रकारची कॅक्टस जमवली होती. करिअरच्या प्रवासात ते थोडं मागंच पडलं; पण आताही माझ्याकडे भरपूर कॅक्टस आहेत.

बागेतली रोपं कधी-कधी छाटावीही लागतात. छाटलेल्या फांद्या लावून परत उगवणार असतील; तर मी त्या माझ्या शेजाऱ्यांना, मित्र-मैत्रिणींना देते. अशीच मी सदाफुलीची रोपंही खूप लोकांना दिलेली आहेत. ज्यांना-ज्यांना मी ती सदाफुली दिली, ते अजूनही म्हणतात, की ‘आहेत हं आमच्याकडे सदाफुलीची फुललेली रोपं.’ हे ऐकून मला फार आनंद होतो. या रोपांमुळे ऋतू कळतात, कोणत्या काळात कोणाला बहर येतो ते कळतं आणि एखादं रोपटं का सुकतं, हेसुद्धा कळतं.

माझे मित्र-मैत्रिणी घरात माणसांना भेटतात, तशी त्यांची नजर माझ्या बागेकडेही जाते. ते बागेतील रोपांना भेटतात, तेव्हा मला फार बरं वाटतं आणि आनंदही होतो.

(शब्दांकन : प्रज्ञा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र

आर. के. नारायण यांच्या अजरामर कथांना उजाळा; ओटीटीवर बालदिनानिमित्त 'मालगुडी डेज'चा नजराणा

Share Market Closing: प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार घसरणीसह बंद; निफ्टीने 23,532 अंकांवर, कोणते 10 शेअर्स वाढले?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अखेर तारक मेहतामधील भिडेंची सोनू अडकणार लग्नबंधनात ! टप्पूशी नाही तर या क्रिएटरशी डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ

SCROLL FOR NEXT