Gardening Tips: अनेक लोकांना बागकाम करायला आवडते. तसेच अनेक लोकांना बागेत गुलाबाचे रोप लावतात पण त्या रोपाला पाहिजे तसे फुल येत नाहीत. गुलाबाची झाडे निरोगी राहण्यासाठी आणि फुले येण्यासाठी त्यांना भरपूर मातीची आवश्यक असते. जमिनीतील पोषक द्रव्ये वाढवण्यासाठी चांगल्या दर्जाचे खत वापरणे आवश्यक असतेच असे नाही. तुम्हाला तुमची बाग फुलांनी भरलेली आणि सुंदर ठेवायची असेल, तर तुम्ही घरच्या घरी खत तयार करू शकता. यासाठी जास्त खर्च देखील येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया आपण गुलाबाच्या रोपांसाठी कोणती घरगुती खते वापरू शकतो.
भाजीपाला आणि फळांची साले, अंड्याची कवच आणि चहाची पाने यासारख्या घरगुती गोष्टींपासून बनवलेले सेंद्रिय खतासारखे असतात. यामुळे मातीत पोषक घटक वाढून गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले येतात.
गांडुळांपासून बनवलेल्या कंपोस्टमध्ये भरपूर पोषक आणि सूक्ष्मजीवांनी युक्त असते. यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते आणि गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले येतात.
अंड्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. यामुळे मुळा मजबुत होतात. अंड्याचे कवच धुऊन वाळवावे आणि त्याची पावडर बनवावी. नंतर मातीच्या मुळात मिक्स करावे. हे गुलाबाच्या रोपांसाठी घरगुती खत म्हणून काम करते.
गुलाबाच्या झाडाला भरपुर फुले येण्यासाठी तुम्ही केळीच्या सालींचा वापर खतासारखा करू शकता. हे पोटॅशियमचा एक चांगला स्रोत मानला जातो. गुलाबाला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यापासून खत तयार करण्यासाठी केळीच्या साली सुकवून त्याची पावडर बनवून ती मातीत मिक्स करू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.