Gardening Tips : झाडे लावायला सगळ्यांनाच आवडतात. मग, तुम्ही गावी राहत असाल किंवा शहरात, त्याने काही फरक पडत नाही. शहरातील घराजवळ छोटीशी बाग किंवा सोसायटीतील गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये आवडीची झाडे लावली जातात. विविध प्रकारची आकर्षक झाडे खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. या झाडांची आपण मनापासून काळजी घेतो. बहरलेली फुले आणि डोलणारी झाडांमुळे तुमची बाग खुलून दिसते.
दैनंदिन जीवनात आपण दररोज झाडांना पाणी घालतो, खत घालतो आणि झाडांची मनापासून काळजी घेतो. परंतु, उन्हाळ्यात एक दिवस जरी झाडांना पाणी द्यायला विसरलो किंवा काही कारणांमुळे पाणी देता आले नाही तरी, झाडे कोमेजून जातात. उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागतात, त्यामुळे, मुलांसोबत फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवले जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत घराबाहेर पडताना मग झाडांची काळजी कशी घेणार? आणि कोण घेणार? असा प्रश्न अनेकांना पडतो.
या परिस्थितीमध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची? ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भातल्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीवर बाहेरगावी असताना ही, तुमची झाडे हिरवीगार ठेवू शकता. कोणत्या आहेत त्या टिप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
उन्हाळ्याच्या सुट्टीवर जाण्यापूर्वी तुम्ही लावलेल्या झाडांच्या कुंड्या सावलीत ठेवा. असे केल्याने झाडांचा तीव्र उन्हाच्या झळांपासून बचाव केला जाऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या झाडांसाठी अशी जागा शोधा की, जिथे सकाळी किंवा संध्याकाळी हलका सूर्यप्रकाश असेल.
वनस्पतींमध्ये दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलचा वापर करू शकता. यासाठी तुमच्या आवडीनुसार, घरातील एखादी लहान किंवा मोठी प्लॅस्टिकची बॉटल घ्या.
आता प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी भरा आणि झाकणाला छोटे छिद्र करा. त्यानंतर, ही बॉटल झाडाला लटकवा किंवा झाडाजवळ ठेवा. बॉटल अशी ठेवा की, त्यातील पाणी झाडाच्या मातीमध्ये झिरपायला हवे. याची अवश्य काळजी घ्या.
झाडांना हिरवेगार ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा असणारा घटक म्हणजे पाणी होय. तुम्ही सुट्टीवर असताना भर उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी तुम्ही नारळाच्या सालीचा वापर करू शकता. त्यासाठी, कात्रीच्या मदतीने नारळाची साल कापून घ्या. ती सूती कापडात शिवून पाण्यात भिजवून रोपाजवळ ठेवा. यामुळे, किमान ४-५ दिवस मातीमध्ये ओलावा राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.