Monsoon Health Care: मॉन्सूनची सुरवात झाली आहे. या काळात बाहेरचे अन्नपदार्थ व दूषित पाण्यामुळे संसर्गजन्य आजाराची जोखीम असते, याशिवाय व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे मुलांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी फ्लू व्हॅक्सिन वरदान ठरते, त्याचबरोबर मुलांना पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे. पावसाळ्यात गॅस्ट्रो अन् टायफॉइडबाधित मुलांच्या संख्येत वाढ होते. अनेक वेळा बाहेरच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला जातो. पाणीही स्वच्छ नसते. स्वच्छतेच्या अभावामुळे गॅस्ट्रो, तसेच टायफॉइडचे रुग्ण वाढतात.
गॅस्ट्रो झालेल्यांमध्ये ३ ते ९ वयोगटातील मुलांची संख्या जास्त असते. चिमुकल्यांची रोगप्रतिकारक्षमता कमी असल्याने दूषित पाणी, शिळे अन्न खाल्ल्याने मुलांना धोका संभवतो. याशिवाय वातावरणात बदल झाल्याने व्हायरल, ताप, सर्दी, खोकला होण्याची भीती असते.
खूप ताप येणे
शरीराचे तापमान १०२ अंश सेल्सिअसच्या आसपास
सर्वप्रथम ताप हलका असतो
हळूहळू ताप वाढतो
तापासोबत अतिसार, जुलाब
भूक कमी झालेली असते
थकवा जाणवतो
शरीरावर गुलाबी रंगाचे डाग दिसतात
टायफॉइड वाढल्यानंतर वजन कमी होते
मळमळ होणे
उलट्या येणे
हगवण
बारीक ताप येणे
अंगदुखी
वारंवार आजारी पडत असल्यास फलू व्हॅक्सिन घ्यावी
मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहार गरजेचा
मुलांना बाहेरचे जंकफूड, फास्ट फूड देऊ नका
मुलांना उकळून थंड केलेले पाणी पाजा
मैदानी खेळासाठी मुलांना प्रोत्साहित करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.