Gatari Amavasya 2024 esakal
लाइफस्टाइल

Gatari Amavasya 2024 : ३ की ४ ऑगस्ट कधी आहे आषाढ अमावस्या, या दिवसाला गटारी अमावस्या का म्हणतात?

सकाळ डिजिटल टीम

Gatari Amavasya 2024 :  

यंदा श्रावण महिन्याची सुरूवात ५ ऑगस्टला होणार आहे. तर, आषाढी अमावस्या कधी आहे हे आपण जाणून घेऊ. तसेच, या अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हणतात. त्याचे कारण काय ते जाणून घेऊ.

यंदा आषाढ आमावस्या ३ ऑगस्टला दुपारी ३ नंतर सुरू होणार असून ती ४ तारखेला साजरी होणार आहे. सर्व अमावस्यांमध्ये आषाढ अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, या दिवशी दीप पूजन असते. आणि या अमावस्येनंतर श्रावणालाही सुरूवात होते.  (Gatari Amavasya 2024 ) 

आषाढ अमावस्येचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. या दिवशी सकाळी स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यानंतर पितरांच्या नावाने दान करावे. या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि धान्य दान करावे. पितरांना अर्पण करण्यासाठी कुश, काळे तीळ आणि पांढरी फुले वापरणे उत्तम मानले जाते.

आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या का म्हणतात?

आषाढ अमावस्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. यामागचं शास्त्रीय कारण असं की पावसाळ्याच्या दिवसात अन्नातून आपल्याला काही आजार होऊ नयेत. सात्विक अन्न आपण सेवन करावे यासाठी हे महत्त्वाचे आहे.

या अमावस्येचे मूळ नाव गतहारी अमावस्या असे आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. याची सुरुवात याच दिवसापासून करावी असे सांगण्यासाठीचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या.

बोलीभाषेत याला गटारी अमावस्या असे म्हटले जाऊ लागले आणि हाच शब्द पुढे प्रचलित झाला, असे सांगितले जाते. आषाढ अमावस्येला पितरांना शांती मिळावी यासाठी काही उपायही केले जातात. पितरांसाठी नैवेद्य ठेवला जातो. तर सायंकाळी दीव्यांची पूजाही केली जाते.

आषाढी अमावस्येदिवशी मोठ्या प्रमाणात गटारी अमावस्या साजरी केली जाते. पुढे संपूर्ण महिना मांसाहार करायला मिळणार नाही. यामुळे यादिवशी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला जातो. गावोगावी आकाडी यात्रा देखील साजऱ्या केल्या जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महाविकास आघाडीला मोठा दिलासा! मतांची विभागणी टाळण्यासाठी 'आप'चा मोठा निर्णय

Sameer Wankhede: समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, हाती घेणार धनुष्यबाण?

India Vs Canada: भारत कॅनडा वादामुळे भारतीय कंपन्यांचं टेन्शन वाढल; शेअर्सवर होणार मोठा परिणाम

IND vs NZ 1st Test : विराट ०, सर्फराज ०, KL Rahul ०, जडेजा ०; भारताचे ६ फलंदाज ३४ धावांत तंबूत

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

SCROLL FOR NEXT