Gauri Ganpati 2023 : सोन्याच्या पावलांनी गवर आली म्हायराला, असं म्हणतं आज दिवसभर गौराईचे आगमन होत आहे. गौराईच्या आगमनाचा मुहूर्त पहाटेपासून दुपारी १.३० पर्यंतचा आहे. त्यामुळे अनेक घरात गौरांईंना घरात घेण्याची घाई सुरू आहे.
गणपती बाप्पा घरी विराजमान झाले की, पाठोपाठ गौराई शंकरोबा, गंगा गौरीचे घरी आगमन होते. पश्चिम महाराष्ट्रात गौराई पती शंकर महादेवांसोबत येते. तर विदर्भात ती महालक्ष्मी म्हणून बहिणीसोबत येते. राज्यभरात गौराईंचे महत्त्व आणि त्या उभ्या करण्याच्या परंपरा काय आहेत हे पाहुयात. (Gouri Ganpati 2023 gauri pujan tradition and importance in marathi)
सुगडाच्या गौरी
विशेषतः देशस्थ ब्राह्मण घरात सुगडाच्या गौरी असतात. त्यातली एक गौर श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी च बसलेली असते. इतर सर्व घरात आजच दोन्ही गौरी येतात. गौरीचा उल्लेख बोलीभाषेत गौर किंवा गवर असा होतो. (Gouri Ganpati)
कराड साताऱ्यात गंगा गौर
कराड सातारा भागात साधारण अशीच पद्धत पण तुळजापूर सोलापूर भागापासून पुढे अगदी पार विदर्भापर्यंत यांना महालक्ष्मी म्हणतात. इथं त्या गणेशाची माता शिवपत्नी नसतात तर विष्णू पत्नी लक्ष्मी आणि तीची जेष्ठ म्हणजे थोरली बहीण अलक्ष्मी मानतात.
इकडे त्यांचे पिढ्यानपिढ्या सांभाळलेले मुखवटे असतात. अलक्ष्मी खरंतर अमंगला पण या दिवसात तिचं पूजन करतात. अशा या दोघी बहिणींसोबत त्यांची बाळं पण बसवली जातात. जेष्ठा नक्षत्रावरच त्यांच पूजन आणि मुख्य सोहळा म्हणजे सवाष्ण भोजन.
गौरी-शंकरोबा
कोल्हापुरात गौराई पतिदेव महादेवांसोबत येते. पहिल्या दिवशी लेकीच म्हणजे गौराईचे आगमन होते तर दुसऱ्या दिवशी शंकरोबा येतात. शकरोबांना खास वाघाच्या कातड्यासारखे दिसणाऱ्या कपड्यात नटवतात.
तेरड्याची गौर
कोकणातही तेरड्याची गौर येते. आज गौरा आली संध्याकाळ होईल तशी तिला नटवायची घाई होते. मग परंपरेने चालत आलेल्या पद्धतीनं नवे साज चढवून गौराई नटून उभी राहते आणि तिला बघून आयाबायांचा जीव सुखावतो. (Ganesh Chaturthi 2023)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.