रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश धीरूभाई अंबानी यांचे घर असलेल्या अँटिलियाबद्दल माहिती नाही असा व्यक्ती सापडणार नाही. जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये त्याची गणणा होते. हे घर सोशल मिडियावर बरेच प्रसिद्ध आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे हे घर साऊथ बाॅम्बे परिसरात आहे. पण फार कमी लोक गौतम अदानी यांच्या घरांबद्दल माहिती असेल.
अदानी ग्रूपचे नावही श्रीमंतांच्या यादीत घेतेले जाते. गौतम अदानी हे संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींच्या जवळपास आहेत. परंतु असे असूनही देशातील या दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
अहमदाबाद, गुजरातमध्ये आपला बहुतांश वेळ घालवणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे मुख्यालयही गुजरातची राजधानी गांधीनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अहमदाबादमध्ये आहे. गौतम अदानी यांचे 'अदानी हाऊस' नावाचे घरही याच शहरात आहे.
याशिवाय काही वर्षांपूर्वी गौतम अदानी यांनी दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये एक बंगलाही खरेदी केला होता. सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये अदानी ग्रुपचे गेस्ट हाऊसही आहे. (Goutam Adani)
शहरातील नवरंगपुरा भागात गौतम अदानी यांचे 'अदानी हाऊस' आहे. शहराच्या गजबजलेल्या भागात असूनही अदानीच्या या घराजवळ पोहोचल्यावर हा परिसर एकदम शांत दिसतो. या घरात बरीच मोकळी जागा सोडण्यात आली आहे. गौतम अदानी यांचेही या घरात पर्सनल ऑफिसही आहे. या घरात ते पत्नी प्रीती अदानी आणि मुलांसोबत राहतात.
गौतम अदानी यांच्या या घराची खरी किंमत किती आहे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली. तरी काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादच्या या भागात प्रॉपर्टीची किंमत 5300 ते 7500 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. त्यानुसार गौतम अदानी यांच्या घराच्या आकारमानाचा विचार करता या मालमत्तेची किंमत कित्येक कोटी रुपये आहे.
काही काळापूर्वी गौतम अदानी यांनीही दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये बंगला खरेदी केला होता. जो 3.4 एकरमध्ये पसरलेले आहे आणि त्याचे बिल्ट-अप क्षेत्र 25,000 स्क्वेअर फूट आहे. गौतम अदानी यांच्या आधी या बंगल्याची मालकी आदित्य इस्टेट्सकडे होती.
दिवाळखोरीनंतर अदानी यांनी एनसीएलटी कारवाईद्वारे हा बंगला खरेदी केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत 400 कोटी रुपये होती. त्याची किंमत 265 कोटी रुपये होती, तर त्याला लीज-होल्डवरून फ्री-होल्ड मालमत्तेत रूपांतरित करण्यासाठी 135 कोटी रुपये द्यावे लागले. सर्वोच्च न्यायालयाजवळ भगवान दास रोडवर त्यांचा बंगला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.