General Knowledge : OYO हा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. कपल्स असो की फॅमिली किंवा ट्रॅवेलर अनेक लोक OYO रुमचा वापर करतात. OYO रुम्सला घेऊन अनेक लोकांचे अनेक गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की OYO रुम्स फक्त कपल्सच बुक करू शकतात पण हे खरं नाही. (General Knowledge do you know full form of oyo )
OYO हा ब्रँड येण्याआधी लोकांना रूम बुक करण्यास खुप कठिण जायचे. कोणत्याही couple अन्य हॉटेलमध्ये रूम बुक करायला गेले तर त्यांना मॅरीड सर्टिफिकेट दाखवायला सांगितले जायचे. त्यानंतर रूम बुक केली जायची.
मात्र OYO आल्यानंतर सर्व अडचणी दूर झाल्या. कारण OYO रूम खूप स्वस्त असतात आणि OYO रूम बुक करताना जास्त नियम नसतात जी एक चांगली गोष्ट आहे. आज OYO ला सर्वच ओळखतात. खूप कमी काळात OYO ने स्वत:ची ओळख बनवली. पण तुम्हाला या OYO विषयी काय माहिती आहे? OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आज आपण OYO विषयी सविस्तर जाणून घेऊया.
OYO चा फुल फॉर्म
OYO हॉटेलमध्ये अनेकजण जातात पण अनेकांना OYOचा फुल फॉर्म माहिती नाही. 'OYO रूम्स'चा फुल फॉर्म 'Own your Own Rooms' आहे पण 99 टक्के लोकांना OYOचा फुल फॉर्म माहिती नसावा.
OYO विषयी
OYO एक होटेल कंपनी आहे जी राहण्यासाठी रूमची सेवा देते. OYO ही कंपनी 2012 मध्ये रितेश अग्रवाल नावाच्या व्यक्तीने उघडली होती. आज OYO देशातील एक मोठी कंपनी आहे. भारतशिवाय अन्य देशातही या OYO हॉटेल्सचे आउटलेट्स आहे. OYO हॉटेलचा वापर सर्वात जास्त couples आणि फिरणारे लोक करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.