लाइफस्टाइल

Home Remedies For Acidity : अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय? मग करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय..

अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी 3 बेस्ट घरगुती उपाय..

Aishwarya Musale

मसाल्यांमुळे भारतीय खाद्य जगभर प्रसिद्ध आहे. हे असे मसाले आहेत जे अन्नाला रुचकर बनवतात. पण हे केवळ चवीपुरते मर्यादित नसून त्याचा आरोग्यालाही फायदा होऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत जे औषधासारखे काम करतात.

स्वयंपाकघरात एकच नाही तर असे अनेक मसाले आहेत जे ॲसिडिटी आणि गॅसची समस्या दूर करू शकतात. जाणून घेऊया अशा मसाल्यांविषयी जे ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम देऊ शकतात.

हे तिन्ही मसाले ॲसिडिटी दूर करतात

ओवा

ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. त्यात थायमॉल नावाचे संयुग असते.

असे करा सेवन

एक चमचा ओवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या.

याशिवाय तुम्ही ओवा चघळूनही खाऊ शकता.

तुम्ही ओव्याचा चहा तयार करून पिऊ शकता. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाका आणि त्याला उकळून प्या.

जिरा 

तुम्ही जिऱ्याचेही सेवन करू शकता. हे ॲसिड न्यूट्रलायझर म्हणून कार्य करते जे पचनास मदत करते आणि ॲसिडिटी दूर करते. जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे चयापचय वाढवते आणि पचन सुधारते. एक ग्लास पाण्यात जिरे रात्रभर भिजत ठेवा. पाणी गाळून दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. भाजलेल्या जिऱ्याचे पाण्यासोबत सेवन केल्यानेही ॲसिडिटीपासून आराम मिळतो.

बडीशेप

बडीशेप खाल्ल्यानेही फायदा होऊ शकतो. बडीशेपमध्ये भरपूर फायबर असते. ते पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही बडीशेपचा चहा पिऊ शकता. हे करण्यासाठी, एक कप पाणी गरम करा आणि त्यात एक चमचा बडीशेप घाला आणि उकळवा. आणि नंतर ते प्या. यामुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंगपासून आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT