how to get rid of dark knees and elbows Esakal
लाइफस्टाइल

Dark Knees and Elbows: तुमचे कोपर आणि गुडघे काळवंडले आहेत, मग या ट्रीक्स वापरून Black Spots होतील दूर

अनेकदा विविध कारणांमुळे आपले कोपर आणि गुडघे Knees काळे पडतात. त्वचेची टॅनिंग दूर करणं सोप असलं तरी कोपर आणि गुडघ्याची टॅनिंग दूर करणं सहज शक्य होत नाही.

Kirti Wadkar

Dark Knees and Elbows Solution: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा कडक उन्हामुळे त्वचा काळवंडते. चेहऱ्याची टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही विविध घरगुती आणि नैसर्गिक उपाय करू शकता. तसचं सनस्क्रीनचा Sun Screen वापर केल्यास टॅनिंगची Tanning समस्या दूर होऊ शकते.

अनेकदा डेड स्किनमुळे देखील त्वचा काळी पडते किंवा त्वचा खूप कोरडी पडल्याने देखील काळी पडते. Get rid of black spots on elbows and knees with these easy tricks

अनेकदा विविध कारणांमुळे आपले कोपर आणि गुडघे Knees काळे पडतात. त्वचेची टॅनिंग दूर करणं सोप असलं तरी कोपर आणि गुडघ्याची टॅनिंग दूर करणं सहज शक्य होत नाही. अनेकदा यामुळे आपण हाफ स्लिव्हजचे शर्ट किंवा टॉप परिधान करत नाही.

तसचं मुलींना देखील काळवंडलेल्या गुडघ्यामुळे शॉर्ट ड्रेस Dress घालण्यासाठी मुश्किल होते. मात्र काही घरगुती उपायांनी कोपर आणि गुडघ्यांची टॅनिंग कमी करणं शक्य आहे. Elbows and knees cleaning tips

लिंबाच्या रसाचा वापर-

काळवंडलेले गुडघे आणि कोपरामुळे तुम्हाही हैराण आहात तर लिंबाचा रस तुमची चिंता दूर करेल. यासाठी लिंबाचा रस कोपर आणि गुडघ्यांना लावा. त्यानंतर २-३ तासांसाठी लिंबाचा रस तसात राहू द्या. लिंबाचा रस ब्लीच प्रमाणे काम करेल आणि काळे डाग फिके होण्यास मदत होईल. 

तीन ते चार दिवस हा प्रयोग सतत केल्याने कोपर आणि गुडघे उजळण्यास मदत होईल. Lemon juice for clean keens 

हळद मलई- 

यासाठी दूधाची जाड मलई घ्यावी. त्यात चमचाभर हळद टाकावी. चांगली पेस्ट तयार करून ही पेस्ट कोपर आणि गुडघ्यांना चागली स्क्रब करावी. त्यानंतर पेस्ट २० मिनिटं वाळू द्यावी.

वाळल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवावे. हळदीमध्ये ब्लिचिंग एडंट असल्याने ते मेलानिन कमी करण्यास मदत करत. परिणामी कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यास मदत होते. Turmeric and cream 

हे देखिल वाचा-

दूध आणि बेकिंग सोडा

दूधातील एक्टिक ऍसिड पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करतं. तर बेकिंग सोडा त्वचा एक्सफोलिएट करून डेड स्किन काढून टाकण्यास मदत करतं. यासाठी दूध आणि बेकिंग पावडर समप्रमाणात घेऊन एक पेस्ट तयार करावी.

या पेस्टने कोपर आणि गुडघ्यांना गोलाकार मसाज करून स्क्रब करावं. १० मिनिटं पेस्ट तशीच ठेवावी त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावी. यामुळे डेड स्किन निघून त्वचा उजळण्यास मदत होईल. 4 Home Remedies to Get Rid Of Dark Elbows and Knees

दही आणि विनेगर

दही आणि विनेगरच्या मिश्रणामध्ये लॅक्टिक आणि एसीटिक ऍसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. एक लहान चमचा दही आणि एक लहान चमचा विनेगर एकत्र मिसळून कोपर आणि गुडघ्यांना लावावं. १० मिनिटांनी ते स्वच्छ धुवाव. यामुळे फरक पडेल. 

माइश्चराइझरचा वापर

यासोबतच कोपर आणि गुडघे काळे होणार नाहित यासाठी आधीपासूनच दक्षता घेतल्यास अधिक सोयीचं ठरेल. यासाठी कोपर आणि गुडघ्यांना नियमितपणे आंघोळीनंतर माइश्चराइझर लावणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा मऊ लावून काळी पडणार नाही. 

अशा प्रकारे तुम्ही नियमितपणे काही उपाय केल्यास कोपर आणि गुडघ्यांची टॅनिंग कमी करणं शक्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT