Elevator Problems esakal
लाइफस्टाइल

Elevator Problems : लिफ्टमध्ये अडकलात तर काय करावे? अन् काय करू नये?

सकाळ वृत्तसेवा

Elevator Problems : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लिफ्ट ही अत्यंत गरजेची सुविधा बनली आहे. मग अचानक लिफ्ट बंद पडली आणि तुम्ही त्यात अडकलात तर काय करावे? घाबरू नका. काही मार्गांचा वापर करून तुम्ही लिफ्टमधून सुखरूप बाहेर पडू शकता.

कधी कधी घाईत आपण लिफ्ट ओव्हरलोड करतो. मात्र, अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता लक्षात घेऊन ओव्हरलोडिंग टाळावे. कोणत्याही लिफ्टसाठी लोडिंग मर्यादा असते, जर तुम्ही ती ओलांडली तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.

काय करावे?

  • घाबरून गोंधळून जाणे टाळा. शांत राहिल्याने तुम्हाला योग्य निर्णय घेता येतील आणि मदत मिळविण्याची शक्यता वाढेल.

  • लिफ्टमध्ये आपत्कालीन बटण असल्यास ते दाबा. जवळपास कोणीतरी असल्यास मदतीसाठी आवाज द्या. मोबाइल फोन असेल तर मदतीसाठी कॉल करा.

  • जर लिफ्ट (Escalator) दरवाजा थोडा उघडा असेल तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या मजल्यावर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा. काही लिफ्टमध्ये असे बटण असते, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या मजल्यावर दरवाजा उघडू शकता.

  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, शांत राहा आणि हळूहळू श्वास घ्या. लिफ्टमध्ये उपलब्ध असलेला पंखा चालू करा.

  • आग किंवा भूकंप झाल्यास लिफ्ट वापरण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमध्ये लहान मुलांना पाठवू नका. जर तुम्ही एखाद्याला कोणत्याही कारणास्तव एकटे पाठवत असाल, तर त्यांना लिफ्ट कशी वापरावी आणि अडकल्यास काय करावे, याची संपूर्ण माहिती द्या. मुलांना नीट समजावून सांगूनच लिफ्टमध्ये पाठवा.

काय करू नये?

  • जबरदस्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नका.

  • लिफ्टच्या आत धूम्रपान करू नका.

  • लिफ्टमध्ये उड्या मारू नका किंवा खाली उतरू नका.

  • वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज

  • तुम्ही रोज वापरत असलेल्या लिफ्टवर लक्ष ठेवा, लिफ्टला वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज आहे. लिफ्टच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा की, ते सर्व्हिस केले गेले आहे की नाही.

  • लिफ्टच्या नियमित सर्व्हिसिंगमुळे तांत्रिक अडचणी कमी होतात. लिफ्टमध्ये अडकणे ही अर्थातातच पॅनिक करणारी घटना असते. परंतु, शांत राहून योग्य ती पावले उचलल्यास तुम्ही सुरक्षितपणे बाहेर पडू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT