Ghatkopar History  esakal
लाइफस्टाइल

Ghatkopar History : एकही घाट नाही तरी मुंबईतल्या उपनगराला घाटकोपर हे नाव कसं पडलं?

सकाळ डिजिटल टीम

Ghatkopar History :

भारतातील अनेक गावांची नावे ही त्यांच्या इतिहासावरून पडलेली आहेत. जसे कोल्हापुरात कोल्हासुर राक्षसाचा वध झाला त्यामुळे कोल्हापूर पडलं.तर, सहा गल्ल्यांची म्हणून सांगली जिल्हा प्रसिद्ध झाला. अशी अनेक गावे आणि त्यांची नावे प्रसिद्ध आहेत.

पण, आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत. ती ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुंबईतील घाटकोपर परिसरात एकही घाट नाही मग त्याला हे नावं कसं पडलं. हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

या परिसरात घाटनदेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या नावावरून या परिसराला घाटकोपर असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते. घाटकोपरमध्ये गुजराती आणि मराठी लोकांची संख्या अधिक आहे. घाटकोपरचे विक्रांत सर्कल, टिळक रोड, नित्यानंद नगर आणि चिराग नगर खूप प्रसिद्ध आहेत.

घाटकोपर हे पूर्वी गाव होतं पण आता मुंबईच्या सर्वात गजबजलेल्या उपनगरांपैकी एक आहे. विद्याविहार आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सेंट्रल लाईनवर हा परिसर आहे. घाटकोपर दोन भागात विभागले आहे. एक घाटकोपर पूर्व आणि दुसरा घाटकोपर पश्चिम म्हणून ओळखला जातो.  

1920 पर्यंत, हा परिसर खाड्या आणि मिठाच्या फ्लॅट्सने वेढलेला होता. पण 1945 मध्ये ते ग्रेटर बॉम्बेचा भाग बनले. आता घाटकोपरलाही मुंबई मेट्रो मार्गाने जोडले आहे. मुंबईच्या उत्तर पूर्व भागातील घाटकोपर हे एक उपनगर आहे.

घाटकोपरच्या नावाबाबत अनेक कथा ऐकायला मिळतात.  घाटकोपर हा मराठी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'घाटावरील कोपरा' असा होतो. एका घाटाच्या काठावर वसलेले असल्यामुळे त्याला घाट कोपर असे नाव पडले.

काही लोक असेही म्हणतात की हे गाव घाटावर वसले होते. त्यामुळे याला 'घाट के उपर' म्हणजेच 'डोंगराच्या माथ्यावर' असे नाव पडले आणि हळूहळू मुंबईच्या स्थानिक भाषेत याला 'घाटकोपर' असे नाव पडले.

मुंबईतील प्रसिद्ध आर सिटी मॉल याच भागात आहे. यात मुंबईतील सर्वोत्तम जिमपैकी एक घाटकोपर जॉली जिम आहे, ज्यामध्ये उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि मोठे मैदान आहे. घाटकोपरच्या रस्त्यांनाही वेगळी नावे आहेत.

येथील मुख्य रस्त्याला नौरोजी लेनचे नाव नवरोजी सेठ यांचे नाव देण्यात आले आहे. तर 'कामा लेन' हे लेडी कामा यांच्या नावावरून तर 'हिंगवाला लेन' हे हिंग व्यापाऱ्याच्या नावावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT