Skin  sakal
लाइफस्टाइल

Skin Care: साजूक तूप म्हणजे सौंदर्याचा खजिना! सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी असा वापर करा

अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.

Aishwarya Musale

अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. तुपामध्ये हेल्दी फॅट असते. तूप जेवणाची चव तर वाढवतेच पण आरोग्यालाही अनेक फायदे देते. तूप केवळ आरोग्यच नाही तर त्वचेला अनेक फायदे देण्याचे काम करते. म्हणूनच हे सुपरफूड देखील मानले जाते. तुपातील पोषक तत्व त्वचेचे पोषण करतात.

तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुपाचाही समावेश करू शकता. स्किनकेअर रूटीनमध्ये तुपाचा समावेश केल्याने कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.

हायड्रेटेड त्वचा

तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी ऍसिड असतात. हे नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करते. यामुळे तुमची त्वचा दीर्घकाळ हायड्रेट राहील. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही त्वचेला तुपाने मसाज करू शकता. तुपामुळे तुमची त्वचा मुलायम राहते.

ओठांना सॉफ्ट बनवतात

फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. हे फाटलेले ओठ बरे करण्याचे काम करते. तुपामुळे तुमचे ओठही मऊ होतात.

टॉक्सिन बाहेर काढते

तुपात जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात. तुमच्या पचनसंस्थेसाठी तूप खूप चांगले आहे. हे शरीरातून टॉक्सिन बाहेर काढते. यामुळे त्वचाही चमकदार आणि तजेलदार दिसते.

डार्क सर्कल

डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांमुळे अनेकांना त्रास होतो. तुम्ही प्रभावित त्वचेवर तूप लावू शकता. यामुळे डार्क स्किन उजळण्यास मदत होईल. तूप लावल्याने तुमची त्वचाही रिलॅक्स होईल. डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी काळ्या वर्तुळांना तुपाने मसाज करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT