Relationship Tips esakal
लाइफस्टाइल

Relationship Tips : मुलींनो 'या' 5 प्रकारच्या पुरुषांना चुकूनही डेट करू नका, कारण...

या जगात तुम्हाला बऱ्याच प्रकारचे पुरुष अनुभवायला मिळतील

सकाळ ऑनलाईन टीम

Boys Nature : या जगात अनेक प्रकारचे पुरुष आहेत. त्यांच्यापैकी काही चांगले असतात, जे आपल्या जोडीदारासाठी काहीही करायला तयार असतात, तर काही नकारात्मकतेने भरलेले असतात, ज्यांच्यासोबत आयुष्य घालवणेच नव्हे तर त्यांच्यापासून दूर जाणेही खूप अवघड होऊन बसते. एवढेच नाही तर त्याच्यापासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला तरी तो तुमच्या नाजूक भावना दुखावण्यास मागेपुढे पाहत नाही. तेव्हा मुलींनी या पाच प्रकारच्या मुलांपासून दूर राहिलेलेच बरे.

महत्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वीच कोणत्या पुरुषांना स्वीकारायचे आणि कोणत्या पुरुषांपासून दूर राहायचे हे कळले तर आयुष्य बऱ्याच अंशी सोपे होऊन जाते. कारण आपल्यापैकी बर्‍याच मुली अशा लोकांना डेट करतात जे त्यांना काही काळानंतर मनाच्या वेदनाशिवाय काहीही देत ​​नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा पुरुषांबद्दल सांगत आहोत, ज्यांच्यासोबत प्रेम तर दूरच, पण मैत्रीचं नातं जपणंही धोक्यापेक्षा कमी नाही.

जर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीसोबत असाल ज्याला फक्त स्वतःची काळजी आहे आणि तुमच्यामध्ये फारसा रस नाही, तर तुम्हाला त्यांच्यापासून दूर जाण्याची गरज आहे. कारण अशी मुले अडचणीच्या वेळी फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यांच्या जोडीदाराला कसे वाटते याने त्यांना काही फरक पडत नाही. अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे होय.

जर तुमचा प्रियकर तुमच्याशी खोटे बोलत असेल तर तुम्हाला तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. याचे कारण असे की, असे लोक अनेक आश्वासने देतात, परंतु जेव्हा ती पाळण्याची वेळ येते तेव्हा ते आपल्या शब्दांना माघारी घेतात. असे लोक खोटे बोलण्यात आघाडीवर असतात.

जर तुम्हाला एखादा माणूस आवडत असेल जो तुम्हाला त्याच्यानुसार बदलू इच्छित असेल तर तो तुमच्यासाठी योग्य माणूस नाही. एवढेच नाही तर, त्याने तुम्हाला त्याच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी ओळख करून देण्यासही नकार दिला, तर असा व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असूच शकत नाही. असे लोक जेव्हा आपला विचार बदलतात तेव्हा फसवणूक करण्यात आघाडीवर असतात. (Relationship Tips)

तुमच्या वागण्याच्या कपडे घालण्याच्या स्टाइलवर जर तुमचा पार्टनर आक्षेप घेत असेल तर असा व्यक्ती तुमच्यावर कायम वर्चस्व गाजवू पाहातो. तेव्हा अशा व्यक्तीच्या कायम दूर राहा. (men)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT