Green Peas Health Benefits esakal
लाइफस्टाइल

Green Peas Health Benefits : मधुमेह आणि त्वचेसाठी लाभदायी आहे मटार; जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

मटारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आढळून येतात.

सकाळ डिजिटल टीम

हिरवागार वाटाणा खायला कुणाला आवडत नाही, हिरव्या वाटाण्याला ‘मटार’ असे ही म्हटले जाते. पावभाजी, मटार पनीर, वाटाण्याची भाजी, मटार करंजी इत्यादी अनेक प्रकार या मटारपासून बनवले जातात. हे सर्व खाद्यपदार्थ आपण आवडीने खातो.

परंतु, या हिरव्या वाटाण्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. हे तुम्हाला माहित आहे का ? मटारमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि प्रोटिन्स असतात. ज्यामुळे, आपल्या शरीराला छान ऊर्जा मिळते. मटारमध्ये असणारे क्यूमेस्ट्रॉल हे पोषक तत्व कॅन्सर विरोधात लढण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मटारमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वांचा समावेश असतो. त्यामुळे, आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. हे फायदे कोणते आहेत ? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

मटारमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम आढळते. ज्यामुळे, आपल्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते मॅग्नेशिअम हे आपल्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत करते. त्यामुळे, आहारात हिरव्या वाटाण्यांचा समावेश अवश्य करा.

मधुमेहासाठी लाभदायी

मटारमध्ये अ‍ॅटीऑक्सिडंट्सचे प्रमाण विपुल असते. या सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे घटक देखील मटारमध्ये आढळून येतात. त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांनी आवर्जून आहारात हिरव्या वाटाण्यांचा समावेश करावा.

त्वचेसाठी फायदेशीर

मटारमध्ये त्वचेसाठी अनुकूल असणारे पोषक घटक असतात. या घटकांमध्ये व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C आणि फोलेट (फॉलिक अ‍ॅसिड) यांचा समावेश होतो.

या सर्व पोषक घटकांमुळे त्वचेतील कोरडेपणा, काळे डाग, निस्तेज त्वचा इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. शिवाय, या पोषक तत्वांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. थोडक्यात काय, तर मटार खाणे हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते

एका संशोधनानुसार मटारमध्ये अ‍ॅंटी कोलेस्ट्रॉल गुण आढळून आले आहेत. त्यामुळे, मटारचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे किंवा ज्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी ही वाढत राहते, त्यांनी मटारचा आहारात जरूर समावेश करावा.

हाडे मजबूत राहतात

हिरव्या वाटाण्यांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि झिंकचे प्रमाण भरपूर असते. यासोबतच, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन K चे मुबलक प्रमाण आढळते. ही सर्व पोषकतत्वे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT