Environmental Revival sakal
लाइफस्टाइल

पर्यावरण पुनरुज्जीवनासाठी ‘ग्रीन’ सोल्यूशन्स...

सकाळ वृत्तसेवा

- पूजा तेंडुलकर, पर्यावरण सल्लागार, सहसंस्थापक, लेम्निअन ग्रीन सोल्यूशन्स

‘पाणी हे जीवन आहे,’ असे आपण म्हणतो. मात्र, लोकांच्या जीवनशैलीतील काही बदलांमुळे पर्यावरणावर घातक परिणाम होत आहेत. आपण त्यांकडे पुरेशा गांभीर्याने पाहात नाही. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काय व कसे काम करायचे या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना स्वतःपासूनच सुरुवात करणे गरजेचे असते, हे मला जाणवले.

त्यातूनच मी गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संर्वधनासाठी विविध पातळ्यांवर व विविध क्षेत्रांमध्ये काम करते आहे. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व मानवाचे जनजीवन विस्कळित होऊ नये यासाठी मी आणि माझे सहकारी डॉ. प्रसन्न आणि यांनी मिळून ‘लेम्निअन ग्रीन सोल्यूशन्स या कंपनीची स्थापना केली.

रत्नागिरीतील लांजा या गावात माझे बालपण गेले. त्यामुळे मी निसर्गाच्या सान्निध्यात वाढले. झाडे, वेगवेगळ्या वनस्पती, ओढे, नद्या यांमध्ये राहायला मला आवडायचे. शिक्षणासाठी गाव सोडावे लागले आणि पुण्यात आले. मला गाव आणि शहरातील निसर्गामध्ये मोठा फरक जाणवला.

शहरात नद्या, ओढे, झाडे दृष्टीस पडणे दुरापास्त झाले आहे. त्याच्या जोडीला वाढत्या प्रदूषणाची समस्या आहे. आपण ज्या निसर्गाच्या सानिध्यात वाढलो, ते आपल्या मुलांना देखील अनुभवता आले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी कामाला सुरुवात केली.

नेचरबेस सोल्यूशन्स् संकल्पना

आम्ही सर्वप्रथम नदी प्रदूषित होऊ नये, यासाठी ‘नेचरबेस सोल्यूशन ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. आम्ही पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ‘डकविड’ या वनस्पतीचा वापर करून पाणी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेवर काम केले होती. यावेळी अनेक नद्यांमधील पाण्याच्या सॅम्पल्सवर प्रक्रिया केली.

सध्या आम्ही भारतभर याच संकल्पनेविषयी माहिती देत आहोत. डकविड या वनस्पतीचा वापर करत असल्याने कंपनीचे नाव लेम्निअन असे ठेवले आहे. युनायटेड नेशनची नेचरबेस सोल्यूशन ही संकल्पना आहे. याचा अर्थ पर्यावरणातून पर्यावरण पूरक डिझाईन तयार करणे आणि पर्यावरणाला हानी पोचणार नाही याची काळजी घेणे.

पर्यावरणातून प्रेरणा घेऊन तयार केलेले सोल्यूशन वापरून ८० ते ९० टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर करता येतो. या संकल्पनेवर काम करताना नदी प्रदूषण रोखायचे असल्यास समस्येच्या मुळापर्यंत जाऊन काम करावे लागणार, हे लक्षात आले. याचा अर्थ नद्यांमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. यातूनच सुरू झाला पर्यावरणपूरक सोल्यूशन्सचा प्रवास...

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन हा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस यांमध्ये आमची ही सिस्टिम देण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला आहे. रसायने आणि विजेचा वापर न करता ही सिस्टिम काम करते. त्यामुळे बाहेर पडणारे पाणी आमच्या सिस्टिममुळे स्वच्छ होते. लोकांना त्याचा वापर बाग किंवा शेतीसाठी करता येतो. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर होतो. आम्ही विविध प्रशासकीय प्रकल्पांमध्ये काम केले आहे आणि ही सिस्टिम पर्यावरणपूरक व परवडणारी राहील, याची दक्षता घेतली आहे.

पर्यावरण जागृती गरजेची

आम्ही गेल्या पाच वर्षांत चाळीस ते पन्नास प्रकल्पांवर काम केले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर काम करण्याचा आमचा मानस आहे. मी पूर्वांचलमध्ये अनेक उद्योगांसाठी मेन्टॉर म्हणून काम करते आहे. त्यातून नेचर बेस सोल्यूशन्स या संकल्पनेविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.

आव्हानात्मक क्षेत्र

या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक संदेश देऊ इच्छिते. पर्यावरणपूरक गोष्टींची जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळात मोठी आव्हाने येतात. त्यांना सामोरे जाण्याची तयारी हवी. संशोधनात्मक काम हा या क्षेत्राचा गाभा आहे, हेही लक्षात ठेवावे.

(शब्दांकन - सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

PAK vs ENG, 2nd Test: पाकिस्तानविरुद्ध बेन डकेटचं वादळी शतक, पण इंग्लंडला शेवटी धक्के; १५ धावांत गमावल्या ४ विकेट्स

Nana Patole : मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना पटोलेंचं उत्तर; म्हणाले, महायुती...

Shakib Al Hasan अखेरचा सामना मायदेशातच खेळणार! ढाका कसोटीसाठी बांगलादेश संघात समावेश

SCROLL FOR NEXT