Gudi Padawa 2024 esakal
लाइफस्टाइल

Gudi Padawa 2024 : ' नव चैतन्याचा सण आला, उत्साहाने भरलेला' गुढी पाडव्याच्या अशा द्या मराठमोळ्या शुभेच्छा!

सकाळ डिजिटल टीम

Gudi Padawa 2024 : हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. यावेळी ९ एप्रिलपासून हिंदू नववर्ष सुरू होत आहे. महाराष्ट्रात हिंदू नववर्ष गुढीपाडवा म्हणून मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. या विशेष प्रसंगी लोक मोठ्या रांगोळ्या काढून, घराची स्वच्छता, सजावट करतात.

समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर उभी करतात आणि पूजा करून सण साजरा करतात. असे केल्याने कुटुंबात सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

आजच्या या खास प्रसंगी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुमच्या मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्यांना द्यायच्या असतील तर तुम्ही हे मेसेज पाठवून गुढीपाडव्याचा सण आणखी खास बनवू शकता. (Gudi Padawa 2024)

१. चैत्राचा मास आला

चाफाही दरदरून बहरला

गुढीप्रमाणे उंच होवो तुमची किर्ती

हीच भगवंता चरणी विनंती

२. गुढी सजली, दारी रांगोळीही काढली

शुभ कार्याची लगबग वाढली

पुरणाच्या पोळीने जेवणालाही रंगत आली

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

३. नव चैतन्याचा सण आला, उत्साहाने भरलेला

कुटुंबासह साजरा करा यंदाचा गुढी पाडवा,

तुम्हाला व तुमच्या कुंटुंबियांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

४.वसंताची पहाट घेऊन आली,

नव चैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू

आला चैत्र पाडवा

Gudi Padawa 2024

५. गुढी उभारू आनंदाची,

गुढी उभारू प्रगतीची

गुढी उभारू ज्ञानाची

गुढी उभारू समाजसेवेची

गुढी उभारू आरोग्याची

गुढी उभारू मदतीची

गुढी उभारू आशिर्वादाची अन् समाधानाची

सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratan Tata: छत्रपती शिवरायांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण...; राज ठाकरेंनी सांगितली रतन टाटांबाबतची आठवण

Ratan Tata Fitness Tips: रतन टाटा उतरत्या वयातही इतके फिट कसे होते? जाणून घ्या त्यांचा फिटनेस फंडा

'Ratan of Bharat'! सचिन तेंडुलकर ते रोहित शर्मा यांच्याकडून Ratan Tata यांच्या कर्तृत्वाला सलाम

Ratan Tata Resume: रतन टाटा यांनी स्वतःच्याच कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तयार केला होता बायोडाटा

पहिलं लग्न तुटण्याचं मला दुःख... अखेर ४० वर्षांनंतर जावेद अख्तर यांनी मान्य केली आपली चूक; म्हणाले- त्या सवयीमुळे

SCROLL FOR NEXT