Jawed Habib Hair Care Tips  Sakal
लाइफस्टाइल

Jawed Habib Tips लांबसडक, घनदाट व मऊ केस हवेत? ट्राय करून पाहा हेअर एक्सपर्ट जावेद हबीबच्या या 5 टिप्स

Hair Care News : घनदाट व लांबसडक केसांकरिता अनेक उपाय करून थकलात का? मग हे सोपे उपाय ट्राय करून पाहा

सकाळ डिजिटल टीम

Jawed Habib Hair Care Tips : जेव्हा केसांची निगा राखण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा आजही बहुतांश लोक वैद्यकीय उपचारांऐवजी घरगुती उपचार करण्यास प्राधान्य देतात. घरच्या घरी केसांची योग्य काळजी घेतली तर केस गळणे व केसांशी संबंधित अन्य समस्या निर्माण होणार नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब देखील हेच सांगतात की, जर तुम्ही घरच्या घरी केसांची काळजी घेतली, तर केस गळतीचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकते. या लेखाच्या माध्यमातून आपण जावेद हबीब यांनी दिलेल्या पाच सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकेल.  

केसगळतीची समस्या रोखण्यासाठी ट्राय करून पाहा जावेद हबीबने सांगितलेले उपाय ( Jawed Habib Home Remedies For Hair Care)

आठवड्यातून दोनदा केसांवर लावा हे तेल 

आठवड्यातून दोनदा केस व टाळूवर खोबरेल तेल लावून मसाज केल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.  तेलातील पोषकघटकांमुळे केस मुळासकट मजबूत होतात. 

आवळ्यामुळे केस होतील मजबूत

आवळ्याचे सेवन केल्यास केस मजबूत होण्यास मदत मिळते, यातील औषधी गुणधर्म केसांसाठी पोषक आहेत. ज्यामुळे केसांना खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. आपण आवळा खाऊ देखील शकता किंवा आवळ्या रस प्यावा. 

ग्रीन टीमुळेही केसांना मिळतात फायदे  

ग्रीन टीमुळे केवळ केसांनाच नव्हे तर संपूर्ण शरीराला फायदे मिळतात, हे आपणास माहितीच आहे. वजन कमी करण्यापासून ते त्वचेच्या समस्या दूर करण्यापर्यंत ग्रीन टीमुळे बरीच मदत मिळते. आपण नियमित ग्रीन टी पीत असाल तर यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत मिळते.

आठवड्यातून एकदा लावावा कोरफडीचा गर 

केसगळतीची समस्या रोखण्यासाठी आपण हेअर केअर रूटीनमध्ये कोरफडीचा समावेश करावा. कोरफडमुळे केसांशी संबंधित समस्या दूर होतात.  कोरफडीचा गर काढून मॅश करा आणि टाळूसह केसांवर लावावा. हलक्या हाताने केसांचा मसाज करावा. यानंतर थोड्या वेळाने केस पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.

कांद्याचा रस 

कांद्यामध्ये सल्फर या घटकाचे प्रमाण मोठ्या असते. यामुळे टाळूच्या भागातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. रक्तप्रवाह सुरळीत सुरू असल्यास केसांची वाढही होते व केसगळतीची समस्या कमी होते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT