Hair Care  esakal
लाइफस्टाइल

Hair Care : केसांना हायलाइट करताना या गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर केसांची वाट लागेल!

सकाळ डिजिटल टीम

Hair Care :

आजच्या काळात केसांना हायलाइट करणे ही प्रत्येकाची आवड बनत चालली आहे. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकालाच आपले केस वेगवेगळ्या रंगांनी हायलाइट करायला आवडतात. स्टायलिश दिसण्यासाठी लोक केसांना हायलाइट्स करतात. तुमचे केस वेगळ्या रंगाने हायलाइट केल्याने तुमचा लूकच बदलत नाही, तर तुमचे व्यक्तिमत्वही बदलते. हायलाइट्स केसांना अतिरिक्त चमक देखील देतात.

जे लोक सतत हायलाइट करतात त्यांना त्याबद्दल माहिती असते. पण, अनेक लोक जे नव्याने हायलाइट करणार असतात त्यांना काही गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे त्यांचे केस चांगले दिसण्याऐवजी अधिकच रूक्ष आणि खराब होतात.

आज आम्ही तुम्हाला काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला हायलाइट्स पूर्ण करताना आणि पूर्ण केल्यानंतरही लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमचे केस खराब होण्याची शक्यता आहे.

केस हायलाइट करताना या गोष्टी लक्षात ठेवा

केसांचा रंग योग्यच निवडा

आपले केस हायलाइट करताना, रंग काळजीपूर्वक निवडा. हायलाइट्स मिळवण्याआधी तुमच्या त्वचेचा टोन देखील लक्षात ठेवा. कारण केसांचा रंग बदलल्यामुळे, तुमचा लूक पूर्ण वेगळा होऊन जाईल. रंग निवडताना, त्वचेचा पोत आणि टोन आणि हवामान दोन्ही लक्षात ठेवा.

प्रोफेशनल सलोन निवडा

केसांवर कोणताही प्रयोग करण्यासाठी प्रोफेशनल पार्लर, सलोन निवडा. कारण, प्रोफेशनर लोकच तुमच्या केसांना योग्यरित्या हायलाइट करू शकतात. अन्यथा, तुमचा प्लॅन फसू शकतो.

मल्टीकलर हायलाइट

अनेक लोक एकाच वेळी दोन-तीन रंगांनी केस हायलाइट करतात. हा लूक बऱ्याच लोकांना चांगला दिसत असला तरी हायलाइट करताना हे लक्षात ठेवा की जर तुम्ही खूप रंग वापरत असाल तर ते तुमचा लुक खराब होऊ शकतो.

कारण ते सगळ्यांना शोभत नाही. या व्यतिरिक्त, वेगवेगळ्या रंगांमुळे, अनेक रसायने तुमच्या केसांमध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे तुमचे केस खराब होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT