Hair Care esakal
लाइफस्टाइल

Hair Care : केस गळून टक्कल पडण्याला कारणीभूत आहेत तुमच्या या चूका, वेळीच सुधरा नाही तर...

Hair Loss Reasons :तुम्हाला मिळत असलेल्या अपुऱ्या पोषक घटकांमुळे तुमचे केस गळू शकतात.

सकाळ डिजिटल टीम

Hair care  :

आजकाल पुरूष आणि महिला दोघांनाही केस गळतीचा त्रास होत आहे. केस गळल्याने लहान वयातच टक्कल पडण्याचे प्रमाण वाढले आहे. केस गळतीला नेहमीच आपली लाईफस्टाईल आणि काळजी न घेण्याच्या स्वभावाला जबाबदार धरलं जातं. पण, तुम्हाला माहितीय का? तुम्ही करत असलेल्या काही चुकांमुळे केस गळती होत आहे.

होय, केस गळण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. केसांच्या गळतीचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुम्ही या चूका टाळणे आवश्यक आहे. या चूका कोणत्या अन् त्या टाळायच्या कशा याबद्दल माहिती घेऊयात.  (Hair Care Reasons)

पोषक घटकांची कमी

लोकांच्या लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल त्यांच्या अनेक समस्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. कारण, या खाण्यातून किती पोषक घटक आपल्याला मिळतात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. कारण, तुम्हाला मिळत असलेल्या अपुऱ्या पोषक घटकांमुळे तुमचे केस गळू शकतात. आहारात व्हिटामिन सी आणि लोहाच्या कमतरतेमुळे केसांचे नुकसान होते.

 

तणाव

तुम्ही घेत असलेल्या तणावामुळे सुद्धा केस गळती होते. तुम्ही ताण-तणावात राहत असाल. तर त्यामुळे शरीरातील टोलेजनची पातळी वाढते. त्यामुळे, केस गळतीला प्रोत्साहन मिळते. तणावात असलेल्या व्यक्तीचे केस विंचरताना, अंघोळीच्या वेळी अधिक प्रमाणात गळू लागतात. त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करायला शिका.

अनुवंशिकता

काही लोकांमध्ये केस गळणे हे अनुवंशिक देखील असू शकते. कारण, अनुंवंशिक गुणधर्मामुळेही केस गळती वाढते. तुम्ही यावर उपाय काही करू शकत नाही. कारण, तुम्ही तुम्हाला अनुवंशिकरित्या मिळालेला हा आजार मुळातून काढू शकत नाही. 

तसेच, अनुवंशिकरित्या टक्कल पडणे हेसुद्धा येते. म्हणजे, अनेक लोकांना अनुवंशिकरित्या टक्कल पडले आहे.

चुकीच्या पद्धती

तुम्ही करत असलेल्या काही चुकांमुळे सुद्धा केस गळती वाढू शकते. जसे, ओले केस विंचरणे, केस विंचरण्याचा कंटाळा येणे या चुकांमुळेही केस गळती वाढते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT