Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : महागडे केमिकलयुक्त हेअर कलर सोडा; केसांना लाल रंग येण्यासाठी मेहंदीमध्ये मिक्स करा 'या' घरगुती गोष्टी

Hair Care Tips : आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केस अकाली पांढरे होत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केस अकाली पांढरे होत आहेत. त्यामुळे, अनेक जण केसांना मेहंदी लावतात किंवा हेअर कलरिंग करतात. सध्या महिलांमध्ये हेअर कलरिंगची ही फार मोठी क्रेझ आहे. यामध्ये तरूणी आघाडीवर आहेत. हेअर कलरिंगमुळे केसांना सुंदर स्टायलिश लूक देखील मिळतो.

हेअर कलरिंगसोबतच, महिला आणि पुरूष देखील केसांना मेहंदी लावतात. मेहंदीमुळे केसांना लालसर कलर मिळतो. शिवाय, केस चमकदार दिसतात आणि पांढऱ्या केसांची समस्या देखील दूर होते. मेहंदी लावताना त्यामध्ये काही घरगुती गोष्टी देखील मिसळल्या जातात. जेणेकरून केसांना चांगले पोषण मिळू शकेल. शिवाय, यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही आणि केस नैसर्गिकरित्या लाल होतात.

मेहंदीमुळे केस सिल्की, चमकदार आणि लालसर दिसण्यास मदत होते. जर तुम्हाला असे वाटत असेल की, मेहंदीचा अधिक प्रभाव केसांवर व्हावा, तर यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये काही गोष्टी मिसळू शकता. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

जास्वंदाच्या फुलांची पावडर

मेहंदीमध्ये तुम्ही जास्वंदाच्या फुलांची पावडर मिसळू शकता. जास्वंद हे फूल केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. जास्वंदाची फुले वाळवून त्यापासून तुम्ही पावडर बनवू शकता किंवा मार्केटमध्ये मिळणारी जास्वंदाची पावडर आणू शकता.

ही ४-५ चमचे पावडर मेहंदीमध्ये मिसळा आणि चहापावडरे गाळलेले पाणी देखील त्यात घाला. रात्रभर ही मेहंदी चांगली भिजू द्या. दुसऱ्या दिवशी केसांना मेहंदी लावा. (Jasmine flower powder)

बीटाचा रस

आपल्या आरोग्यासाठी बीट अतिशय फायदेशीर मानले जाते. बीटामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांसोबतच बीटाचा लाल रस हा केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो. कसा ते आपण पाहूयात.

केसांना अधिक लाल रंग मिळवून देण्यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये बीटाचा रस मिसळू शकता. यासाठी ५-६ चमचे मेहंदीमध्ये ३-४ चमचे बीटाचा रस मिसळा. आता हे मिश्रण रात्रभर लोखंडाच्या तव्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण केसांना लावा. यामुळे, केसांना सुंदर रेड लूक मिळण्यास मदत होईल. शिवाय, केस मुलायम दिसतील. (Beetroot Juice)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Vikhe Patil Won Shirdi Assembly Election 2024 final result live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT